देशात ओमायक्रॉनचे २०० रुग्ण

देशात ओमायक्रॉनचे २०० रुग्ण

नवी दिल्लीः देशातल्या १२ राज्यात मंगळवारी ओमायक्रॉन विषाणूची लागण झालेल्या २०० रुग्णांची नोंद झाली. या पैकी सर्वाधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्र व नवी द

अमिताभ बच्चन यांच्या व्हिडिओतून दिशाभूल करणारी माहिती!
भिवंडीत अडकले लाखो कामगार
लॉकडाउनच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे कसोटीचे!

नवी दिल्लीः देशातल्या १२ राज्यात मंगळवारी ओमायक्रॉन विषाणूची लागण झालेल्या २०० रुग्णांची नोंद झाली. या पैकी सर्वाधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्र व नवी दिल्लीत असल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची दुपटीने नोंद झाली असली तरी अद्याप या विषाणू प्रकाराने कोणाचाही मृत्यू झालेला नाही. ओमायक्रॉनची लागण झालेले ४० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून ते रुग्णालयातून घरी गेल्याची माहिती आहे. ओमायक्रॉनची लागण झालेल्या ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण आढळलेले नाही, असे आरोग्य मंत्र्यांचे म्हणणे आहे.

देशात कोविड-१९ प्रतिबंधित लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांची आकडेवारी ८७ टक्के झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत कोविड-१९ची लागण झालेल्यांची संख्या ५,३२६ इतकी असून गेल्या दीड वर्षांतील ही सर्वात कमी आकडेवारी असल्याचे आरोग्य खात्याने सांगितले आहे. देशात आजपर्यंत कोविड रुग्णांची संख्या ३४.७५ दशलक्ष इतकी झाली आहे. ही आकडेवारी अमेरिकेनंतर सर्वाधिक आहे.

महाराष्ट्रात मंगळवारी ११ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली.  आतापर्यंत ही संख्या ६५ झाली असून ३४ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

राज्यात मंगळवारी १४ कोरोना रुग्णांचे मृत्यू मंगळवारी राज्यात कोविडमुळे १४ रुग्णांचे मृत्यू झाले असून राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ७,१११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात ७३,०५३ कोरोना रुग्ण घरात विलिगकरणात आहेत तर ८६४ रुग्ण संस्थात्मक विलिगीकरणात आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: