मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री सुरू करण्याच्या हालचाली

मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री सुरू करण्याच्या हालचाली

नवी दिल्ली : येत्या १५ एप्रिलपासून देशातील काही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री पुन्हा सुरू करण्याचा विचार केंद्र सरकारचा असल्याची माहिती दोन सरकारी अधिकार्यांनी रॉयटरला दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मंत्रालयांना महत्त्वाचे असे कोणते उद्योग सुरू करावे लागतील या संदर्भात आपापल्या योजना तयार करण्यास सांगितले आहे. त्यानुसार काही व्यवसाय, कारखाने १५ एप्रिलपासून सुरू होतील.

औद्योगिक खात्याने वस्त्रोद्योग, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स व अन्य क्षेत्र सुरू करण्याबाबत आपली सहमती दर्शवली आहे. ही क्षेत्रे सुरू करण्यासाठी नवे वेळापत्रक जाहीर केले जाईल, मनुष्यबळाचे नवे व्यवस्थापन आखले जाईल व सामाजिक विलगीकरण सांभाळणे सक्तीचे केले जाईल, अशी उपाय योजना आखण्यात येत आहे. पण गृह मंत्रालय व पंतप्रधान कार्यालयाने होकार दिल्यावरच हा निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

काही खात्यांनी आपापल्या क्षेत्रातील उद्योग अंशतः सुरू करण्यासाठीही हालचाली सुरू केल्या आहेत.

मूळ बातमी

COMMENTS