युक्रेनमध्ये गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

युक्रेनमध्ये गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

नवी दिल्ली/हवेरी/मुंबई/कीव्ह/युनायटेड नेशन्स/मॉस्को: युक्रेनच्या खार्किव्ह शहरात मंगळवारी सकाळी झालेल्या गोळीबारात कर्नाटकातील रहिवासी असलेल्या भारतीय

लढवय्या पँथर
आठशे वर्षांच्या संवादाची पार्श्वभूमी
उत्तराखंडातील मंत्र्याची शंकरावर जलाभिषेक करण्याची खात्याला सक्ती

नवी दिल्ली/हवेरी/मुंबई/कीव्ह/युनायटेड नेशन्स/मॉस्को: युक्रेनच्या खार्किव्ह शहरात मंगळवारी सकाळी झालेल्या गोळीबारात कर्नाटकातील रहिवासी असलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, कर्नाटकातील २० वर्षीय नवीन शेखरप्पा ग्यानगौदार असे या भारतीय विद्यार्थ्याचे नाव आहे. तो खार्किव्ह नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये चौथ्या वर्षात शिकणारा वैद्यकीय विद्यार्थी होता.

नवीनच्या वसतिगृहात राहणाऱ्या श्रीधरन गोपालकृष्णन याने सांगितले, “युक्रेनच्या वेळेनुसार काल सकाळी साडेदहाच्या सुमारास नवीनची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.” रशियन सैन्याने लोकांवर गोळीबार केला तेव्हा तो एका किराणा दुकानासमोर रांगेत उभा होता. त्याच्या मृतदेहाबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. आम्हाला दवाखान्यात जाता आले नाही, कदाचित त्याचा मृतदेह तिथेच ठेवला असेल.

परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केले आहे, की  आम्ही अत्यंत दुःखाने पुष्टी करतो की सकाळी खार्किव्हमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

मंत्रालयाने सांगितले की ते विद्यार्थ्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत. त्यांनी म्हटले आहे, की ‘आम्ही कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो.’

दुसर्‍या एका ट्विटमध्ये म्हटले आहे, की  “परराष्ट्र सचिवांनी रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांना बोलावले असून, खार्किव्ह आणि शहरांमधील इतर संघर्ष क्षेत्रांमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी त्वरित सुरक्षित मार्ग देण्यास सांगितले आहे. रशिया आणि युक्रेनमधील भारतीय राजदूतही अशीच कारवाई करत आहेत.

यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थी कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील चालगेरी येथील रहिवासी होता.

कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. मनोज राजन यांनी सांगितले, की नवीन शेखरप्पा ग्यानगौदार, हावेरी जिल्ह्यातील चालगेरी येथील रहिवासी असून, गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.

रशियाने मोठे लष्करी आक्रमण सुरू केलेल्या खार्किव्हमध्ये अजूनही अनेक भारतीय अडकले आहेत.

खार्किव शहरात युक्रेनचे सैनिक आणि रशियन सैन्य यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे.

खार्किव्हमध्ये विद्यार्थ्यांशी दूतावासाने संपर्क साधला नाहीः विद्यार्थ्याच्या वडिलांचा आरोप

रशियन हल्ल्यांदरम्यान युक्रेनमध्ये गोळीबारात ठार झालेल्या कर्नाटकच्या विद्यार्थ्याचे वडील ग्यानगौदार यांनी मंगळवारी आरोप केला, की भारतीय दूतावासातील कोणीही युक्रेनच्या खार्किव्हमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क साधलेला नाही.

नवीन हा कर्नाटकातील इतर विद्यार्थ्यांसह खार्किव्ह येथील बंकरमध्ये अडकला होता, असा दावा त्याचे काका उज्जनगौडा यांनी केला. तो सकाळी चलन बदलण्यासाठी व खाद्यपदार्थ घेण्यासाठी गेला असता गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

त्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच चलेरी येथील त्याच्या घरी शोककळा पसरली. त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक पोहोचले.

उज्जनगौडा म्हणाले, “तो मंगळवारीच त्याच्या वडिलांशी फोनवर बोलला होता आणि बंकरमध्ये खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी काहीही नसल्याचे त्याने सांगितले होते.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ग्यानगौदार यांना फोन करून शोक व्यक्त केला.

बोम्मई यांनी ग्यानगौदार यांना आश्वासन दिले, की ते त्यांच्या मुलाचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0