निर्यातीत ५.४ टक्के घसरण

निर्यातीत ५.४ टक्के घसरण

नवी दिल्लीः ऑक्टोबरमध्ये देशाच्या निर्यातीत ५.४ टक्के घसरण होऊन ती २४.८२ अब्ज डॉलर इतकी झाली असून पेट्रोलियम पदार्थ, चामड्याच्या वस्तू, रत्न आणि दागिन

वस्तुविक्रेत्याचा नाटकीपणा आणि खोटेपणा : मोदींचे भाषण ‘पाहावे’ कसे? – भाग १
सर्व मुस्लिमांचे स्वागत करू, असे म्हणून दाखवा : अमित शाह
फडणवीसांची बखर – ३ : मी पुन्हा जाईन

नवी दिल्लीः ऑक्टोबरमध्ये देशाच्या निर्यातीत ५.४ टक्के घसरण होऊन ती २४.८२ अब्ज डॉलर इतकी झाली असून पेट्रोलियम पदार्थ, चामड्याच्या वस्तू, रत्न आणि दागिने यांच्या निर्यातीत प्रामुख्याने घट झाल्याचा हा परिणाम असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल ते ऑक्टोबर २०२०-२१पर्यंत निर्यात १९.०५ टक्क्याने घसरून १५०.०७ अब्ज डॉलरपर्यंत पोहचली होती.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निर्यात २६.२३ अब्ज डॉलर होती ती ऑक्टोबर २०२० पर्यंत २४.८२ अब्ज डॉलर झाली. ही घसरण ५.४ टक्के असल्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्याने आपल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

देशाची आयातही ऑक्टोबरमध्ये ११.५६ टक्के इतकी घसरून ३३.६ अब्ज डॉलर झाली आहे.

भारताची आयात-निर्यातीतील एकूण तूट आता ८.७८ अब्ज डॉलरवर येऊन पोहचली आहे. गेल्या वर्षी ही तूट ११.७६ अब्ज डॉलर इतकी होती.

एप्रिल ते ऑक्टोबर या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये निर्यात १९.०५ टक्क्यांनी (१५०.०७ अब्ज डॉलर), तर आयात ३६.२८ टक्क्यांनी (१८२.२९ अब्ज डॉलर) कमी झाली आहे.

निर्यातमध्ये गेल्या महिन्यात पेट्रोलजन्य पदार्थात ५३.३० टक्के, रत्न व दागिन्यांमध्ये २१.५७ टक्के, चामड्याच्या वस्तूंमध्ये १६.६९ टक्के, विद्युत उपकरणांमध्ये ९.४० टक्के, तर अभियांत्रिकी वस्तूंमध्ये ३.८४ टक्के घसरण झाली आहे. निर्यातीबाबतीत तांदूळ, तेल, गालिचा, औषधे, मसाल्याचे पदार्थ, कापूस, रासायनिक पदार्थामध्ये वाढ झाली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: