देशातील वनक्षेत्र वाढले; डोंगराळ प्रदेशात मात्र घट

देशातील वनक्षेत्र वाढले; डोंगराळ प्रदेशात मात्र घट

कोचीः देशातील वनक्षेत्र व झाडांची संख्या वाढली आहे. २०२१चा राज्यांच्या वनक्षेत्राचा अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यानुसार २०१९पासून आजपर्यंत देशाच्या वनक

‘एनडीए’चा वन कायद्याचा मसुदा ब्रिटिश कायद्याहूनही निष्ठुर
पक्ष्यांच्या आवाजाची किमया
नमो पर्यावरणाय

कोचीः देशातील वनक्षेत्र व झाडांची संख्या वाढली आहे. २०२१चा राज्यांच्या वनक्षेत्राचा अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यानुसार २०१९पासून आजपर्यंत देशाच्या वनक्षेत्रात २,२६१ चौ. किमी वाढ होऊन देशाचे एकूण वनक्षेत्र ८.०९ लाख चौ. किमी इतके झाले आहे. ही आकडेवारी देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २४.६२ टक्के इतकी आहे. देशातील मँग्रुव्हचे क्षेत्रही १७ चौ. किमीने वाढले आहे.

पण या अहवालात देशातील डोंगराळ प्रदेश, टेकड्या व आदिवासी जिल्ह्यातील वनक्षेत्रात घट झाल्याचीही नोंद झाली आहे.

केंद्रीय पर्यावरण खात्याने हा अहवाल १३ जानेवारीला प्रसिद्ध केला. या अहवालात वनक्षेत्राची व्याख्याही करण्यात आली आहे. वनक्षेत्राची मोजणी रिमोट सेन्सिंगद्वारे करण्यात आली आहे. या वनक्षेत्राच्या व्याख्येनुसार प्रत्यक्ष वन व अन्य ठिकाणी वृक्षांनी व्याप्त केलेले प्रदेश अशी वर्गवारी करण्यात आली आहे. देशात प्रत्यक्ष वनांखालील क्षेत्र ७,१३,७८९ चौ. किमी असून वृक्षांखालील क्षेत्र ९५,७४८ चौ. किमी इतके आहे.

वन खात्याच्या अहवालानुसार देशातील १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ३३ टक्के भूभाग हा जंगलाने व्याप्त असून देशातील सर्वाधिक जंगले मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओदिशा व महाराष्ट्र या राज्यात आहेत.

आंध्र प्रदेश (६४७ चौ. किमी), तेलंगणा (६३२ चौ. किमी), ओदिशा (५३७ चौ. किमी), कर्नाटक (१५५ चौ. किमी), झारखंड (११० चौ. किमी) या राज्यात वनक्षेत्रे वाढले आहे.

देशातील घनदाट वनांचे क्षेत्रफळ ९९,७७९ चौ. किमी. (एकूण ३ टक्के) इतके असून मध्यम वनक्षेत्र ३,०६,८९० चौ. किमी व अन्य वनक्षेत्र ३,०७,१२० चौ. किमी इतके नोंदले गेले आहे.

देशातील वनक्षेत्रांतील कार्बनचा साठा ७९.४ दशलक्ष टन इतका आहे. २०१९ पासून यामध्ये ७,२०४ दशलक्ष टन वाढ झाली आहे. तर एकूण लाकूडसाठा ६,१०० दशलक्ष क्युबिक मीटर्स इतका आहे. 

डोंगराळ-टेकड्या व आदिवासी क्षेत्रातील वनक्षेत्र घटले

गेल्या दोन वर्षांत देशातील डोंगराळ-टेकड्यांच्या क्षेत्रातील वनक्षेत्र ९०२ चौ. किमीने घटले आहे. २०१९च्या वन अहवालात देशात डोंगराळ भागातील वनक्षेत्र ५४४ चौ. किमीने वाढले होते.

आदिवासी पट्ट्यातही वनक्षेत्र ६५५ चौ. किमीने घटले आहे. एकूणात देशातील ईशान्येकडील राज्यांमध्ये वनक्षेत्र १,०२० चौ. किमीने कमी झालेले असून या राज्यांमध्ये आता एकूण वनक्षेत्र १,६९,५२१ चौ. किमी (६४ टक्के) इतके नोंदले गेले आहे.

वनक्षेत्र घटलेली राज्ये पुढील प्रमाणे अरुणाचल प्रदेश (२०७ चौ. किमीने वनक्षेत्र घटले), मणिपूर, नागालँड, मिझोराम व मेघालय.   

नवी माहिती

वनखात्याने यावेळच्या अहवालात वेगळ्या नोंदी केल्या आहेत. देशातील व्याघ्र संरक्षण क्षेत्रातील जंगलाची आकडेवारीही यावेळी जाहीर करण्यात आली आहे. देशात ३२ व्याघ्र संरक्षण अभयारण्ये असून त्यांचे क्षेत्रफळ ५५,६६६ चौ. किमी इतके आहे. या वनक्षेत्राचे देशातील एकूण वनक्षेत्रातील टक्केवारी ७.८ टक्के आहे. पक्के, अचानकमार, सिम्लीपाल, काली, दाम्पा व्याघ्र अभयारण्यातील वनक्षेत्र ९० टक्क्याहून अधिक आहे. वाघांच्या मार्गातील जंगल हे ११,५७५ चौ. किमी इतके आहे.

२०२१च्या अहवालात तापमानवाढीवरही दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. त्यानुसार लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यातील तापमान वाढले असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0