देशाचा जीडीपी उणे २३.९ टक्के

देशाचा जीडीपी उणे २३.९ टक्के

नवी दिल्लीः कोरोना महासाथ व लॉकडाऊन यामुळे गटांगळ्या खात असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीतील विकास दर (जीडीपी) उणे

भारताची स्थिती मागे उडणाऱ्या विमानासारखी – अरुंधती रॉय
बिहारमध्ये जदयु – भाजपमध्ये लव्ह जिहाद !
कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्लीः कोरोना महासाथ व लॉकडाऊन यामुळे गटांगळ्या खात असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीतील विकास दर (जीडीपी) उणे २३.९ टक्क्यांनी खाली आला आहे. सोमवारी केंद्रीय सांख्यिकी विभागाने ही आकडेवारी जाहीर केली.

गेल्या वर्षी २०१९-२०मध्ये पहिल्या तिमाहीत विकासदर ५.२ टक्के होता. करोनामुळे आर्थिक विकासदर वेगाने खाली जाईल असे अनेक वित्तीय संस्था, रेटिंग कंपन्या व अर्थतज्ज्ञांचे मत होते.

विकासदर एवढा खाली व उणे जाण्यामागचे कारण असे की, गेल्या तिमाहीत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात घसरण उणे ३९.३ टक्के झाली. त्याशिवाय गृहनिर्माण क्षेत्रात उणे ५०.३ टक्के, उद्योगात उणे ३८.१ टक्के, खाण क्षेत्रात २३.३ टक्के व सेवा क्षेत्रात उणे २०.६ टक्के घसरण झाली. एवढेच नव्हे तर वीज, गॅस, पाणी पुरवठा व अन्य सेवांमध्ये ७ टक्के घट झाली. शिवाय व्यापार, हॉटेल, दळणवळण, संपर्क व प्रसारणाशी निगडित अन्य सेवांमध्ये ४७ टक्क्यांची घसरण झाली.

पण एप्रिल-जून या तिमाहीत शेती, वन्य व मत्स्य उद्योगात मात्र ३.४ टक्के वृद्धी झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तो ३ टक्के होता.

दरम्यान एप्रिल ते जून या तिमाहीत चीनच्या अर्थव्यवस्थेत ३.२ टक्के वृद्धी झाली असून जानेवारी ते मार्च या तिमाहीत ६.८ टक्के घसरण झाली होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0