पाँचजन्यची अॅमेझॉनवरही टीका; भ्रष्टाचाराचा आरोप

पाँचजन्यची अॅमेझॉनवरही टीका; भ्रष्टाचाराचा आरोप

नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे साप्ताहिक पाँचजन्यने आता जगातील बलाढ्य ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनला लक्ष्य केले आहे. या साप्ताहिकाने आपल्या नव्या अ

उद्दाम माणूस आणि नव्या व्यवस्थेची गरज
गर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस
अ‍ॅमेझॉनवर आलेले मानवनिर्मित संकट

नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे साप्ताहिक पाँचजन्यने आता जगातील बलाढ्य ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनला लक्ष्य केले आहे. या साप्ताहिकाने आपल्या नव्या अंकात अॅमेझॉन कंपनीने सरकारी धोरणे आपल्या बाजूने व्हावीत म्हणून कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला आहे. पाँचजन्यचा हा नवा अंक येत्या ३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होत असून या अंकाच्या मुखपृष्ठावरच ‘ईस्ट इंडिया कंपनी २.०’ असा मथळा मांडत अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. १८ व्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताचे शोषण केले तसे शोषण अॅमेझॉन करत असून ही कंपनी ईस्ट इंडिया कंपनीचा दुसरा अवतार असल्याचे पाँचजन्यचे म्हणणे आहे.

अॅमेझॉनला संपूर्ण भारतीय बाजारपेठेवर कब्जा करायचा असून त्यांना मक्तेदारीही प्रस्थापित करायची आहे. यासाठी या कंपनीने सामान्य भारतीय नागरिकाचे स्वातंत्र्य, देशाची अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था आपल्या ताब्यात घेतल्याची टीका पाँचजन्यने केली आहे.

पाँचजन्यच्या अंकात ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवरही टीका करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर दाखवले जात असलेले चित्रपट, मालिका भारतीय संस्कृतीला मारक असून त्याने भारतीय संस्कृतीचा नाश सुरू केला असल्याचे पाँचजन्यचे म्हणणे आहे.

पाँचजन्यने अॅमेझॉनवर भ्रष्टाचार व लाचलुचपतीचाही आरोप केला आहे. सरकारी धोरणे आपल्याला धार्जिणी व्हावीत म्हणून अॅमेझॉनने कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचे पाँचजन्यचे म्हणणे आहे.

फ्युचर ग्रुप ताब्यात घेण्यावरून अॅमेझॉनची कायदेशीर लढाई सुरू आहेत. याची चौकशी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडून सुरू आहे.

२०१८-२० या काळात भारतामध्ये आपले अस्तित्व राहावे म्हणून अॅमेझॉनने लाच व कायदेशीर लढाईसाठी सुमारे ८,५४६ कोटी रु. खर्च केल्याचा अंदाज असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने केली होती. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या स्वदेशी जागरण मंचने अॅमेझॉनकडून देशाच्या कायद्याचे थेट उल्लंघन केले जात असल्याचा आरोप केला होता. अॅमेझॉन बेकायदा मार्गाने आपला व्यवसाय देशात करत असल्याचे स्वदेशी जागरण मंचाचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: