भारतात ४० कोटी बेरोजगार : आंतरराष्ट्रीय मजूर संघटना

भारतात ४० कोटी बेरोजगार : आंतरराष्ट्रीय मजूर संघटना

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संक्रमणामुळे भारतात पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशात असंघटित क्षेत्रातील काम करणार्या सुमारे ४० कोटी नागरिकांपुढे रोजगा

१० मजूर – ८०० किमी अंतर -६० तास प्रवास
कोरोनाचा पुनःसंक्रमणाचा धोकाः आयसीएमआर
मुंबई-दिल्लीत कोरोनाची साथ तिसऱ्या टप्प्यात!

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संक्रमणामुळे भारतात पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशात असंघटित क्षेत्रातील काम करणार्या सुमारे ४० कोटी नागरिकांपुढे रोजगार गमावण्याची भीती आहे व ते पुन्हा गरीबीत ढकलले जाऊ शकतात, तर जगातील सुमारे १९ कोटी ५० लाख लोकांच्या पूर्णकालिक नोकर्या जाऊ शकतात, अशी भीती संयुक्त राष्ट्रांच्या अखत्यारित असलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने (आयएलओ) व्यक्त केली आहे. कोरोनाचे संकट हे दुसर्या महायुद्धानंतरचे अधिक भयावह असे संकट आहे, असेही मजूर संघटनेचे मत आहे.

संघटनेचे अध्यक्ष गाय रायडर यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत एक अहवाल प्रसिद्ध करताना कोरोना संकटामुळे विकसित व विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त होत चालल्या असून दोघांनाही आपल्या अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी एकमेकांची मदत घेत शर्थीचे प्रयत्न करावे लागतील असे मत व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या अहवालानुसार जगात सुमारे २ अब्ज लोकसंख्या असंघटित क्षेत्रात काम करते. हा मोठा वर्ग भारत, नायजेरिया, ब्राझील अशा विकसनशील राष्ट्रांमध्ये काम करतो. या घडीलाच असंघटित क्षेत्रातील लाखो श्रमिकांना लॉकडाऊनमुळे तडाखा बसला आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर लाखो स्थलांतरित मजूर आपापल्या गावी गेले आहेत किंवा अनेक शहरांमध्ये अडकून पडले आहेत. या स्थलांतरितांना लगेच काम मिळणे कठीण आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

या अहवालानुसार अरब देशांमध्ये सर्वाधिक नोकर कपात होणार असून त्यानंतर युरोप व आशिया-पॅसिफिक क्षेत्रात होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वाचकांच्या माहितीसाठी २२ मार्च ते ५ एप्रिल या काळात शहरांमध्ये २२ टक्क्याने बेरोजगारी वाढली होती. सीएमआयईच्या आकडेवारीनुसार ५ एप्रिलला शहरातील बेरोजगारी दर ३०.९३ टक्क इतका होता तर २२ मार्चपर्यंत हा दर ८.६६ टक्के होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: