‘रामायण एक्स्प्रेस’मधील वेटर्सच्या गणवेशात बदल

‘रामायण एक्स्प्रेस’मधील वेटर्सच्या गणवेशात बदल

नवी दिल्ली: रामायण एक्स्प्रेसमधील वेटर्सचे भगव्या रंगाचे गणवेश बदलण्याची घोषणा रेल्वेने केली आहे. वेटर्सना भगवा गणवेश देणे हा हिंदू धर्माचा अपमान आहे

अर्णबवरील फिर्याद रद्द करण्यास नकार
घुसखोरी नाही, शत्रूला धडा शिकवला – मोदी
न्या. विजया ताहिलरामाणी यांचा राजीनामा

नवी दिल्ली: रामायण एक्स्प्रेसमधील वेटर्सचे भगव्या रंगाचे गणवेश बदलण्याची घोषणा रेल्वेने केली आहे. वेटर्सना भगवा गणवेश देणे हा हिंदू धर्माचा अपमान आहे असा निषेध काही साधूंनी केल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने ही घोषणा केली आहे. रेल्वेने वेटर्सचे गणवेश बदलले नाहीत, तर १२ डिसेंबर रोजी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकात रामायण एक्स्प्रेस अडवून धरण्याची धमकी साधूंनी दिली, त्याच दिवशी रेल्वेने गणवेश बदलण्याची घोषणा केली.

रेल्वेने कोणत्याही वादात न पडण्याची भूमिका घेतली आहे आणि गणवेशात बदल करून तो स्वीकारार्ह पद्धतीचा केला जाणार आहे, असे रेल्वे बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

‘रामायण’ सर्किट ट्रेनने आपला १७ दिवसांचा प्रवास ७ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकातून सुरू केला. ही ट्रेन भगवान श्रीरामांच्या आयुष्याशी निगडित १५ ठिकाणांना भेटी देणार आहे.

७,५०० किलोमीटरचे अंतर कापणारी हीरा ट्रेन अयोध्या, प्रयागराज, नंदिग्राम, जनकपूर, चित्रकूट, सीतामढी, नाशिक, हंपी आणि रामेश्वर या तीर्थस्थळांना भेटी देणार आहे. रामायण एक्स्प्रेसमध्ये रेस्तराँ, लायब्ररी व शॉवर क्युबिकल्स आहेत.

“वेटर्सना भगवा वेश व साधुंसारखा फेटा देणे तसेच माळा व रुद्राक्ष घालायला देणे हा हिंदू धर्माचा अपमान आहे,” असे उज्जैन आखाडा परिषदेचे माजी सरचिटणीस अवधेशपुरी म्हणाले.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) एका मीडिया आउटलेटने विचारलेल्या प्रश्नाला पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे- “असे कळवण्यात येते की, सेवा कर्मचाऱ्यांचा गणवेश पूर्णपणे बदलण्यात आला असून, त्यांना पूर्णपणे प्रोफेशनल वेश देण्यात आला आहे.”

हा धर्म व संस्कृती यांचा विजय आहे आणि हा मुद्दा उचलणे आमचे कर्तव्यच होते, अशी प्रतिक्रिया अवदेशपुरी यांनी आयआरसीटीसीने केलेल्या घोषणेवर दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0