सैनिकांना शुभेच्छा पत्रे देण्यास दिरंगाई : ७० महसूल सेवा अधिकाऱ्यांना नोटीस

सैनिकांना शुभेच्छा पत्रे देण्यास दिरंगाई : ७० महसूल सेवा अधिकाऱ्यांना नोटीस

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सैनिकांना शुभेच्छा पत्रे न दिल्याच्या कारणावरून नागपूरस्थित ‘नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्स’च्या प्रमुख स

महिलांना एनडीए प्रवेश देण्यास सैन्याची मंजुरी
म्यानमारः लष्करशाहीचा थयथयाट
नेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सैनिकांना शुभेच्छा पत्रे न दिल्याच्या कारणावरून नागपूरस्थित ‘नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्स’च्या प्रमुख संचालक अलका त्यागी यांनी ७० प्रशिक्षणार्थी आयआरएस अधिकाऱ्यांना कारणे दाखवे नोटीस बजावली आहे.

‘नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्स’ या संस्थेत भारतीय महसूल शाखेत (इंडियन रेव्हन्यू सर्विस – आयआरएस) निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण घेतले जाते. यंदाच्या बॅचमध्ये १५० प्रशिक्षणार्थी अधिकारी असून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या सर्वांना सैनिकांसाठी शुभेच्छा पत्रे तयार करण्याची जबाबदारी संस्थेच्या अतिरिक्त महासंचालक नौशिन अन्सारी यांनी दिली होती. ही शुभेच्छा पत्रे प्रत्येक अधिकाऱ्याने स्वत: तयार करावी असा दंडक होता पण १५ जानेवारीपर्यंत १५० पैकी ८० अधिकाऱ्यांनीच ही शुभेच्छा पत्रे तयार केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संस्थेच्या प्रमुख संचालक अलका त्यागी यांनी शुभेच्छा पत्रे सादर न करणाऱ्या ७० अधिकाऱ्यांवर बेशिस्तीचा ठपका ठेवत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. ७० अधिकाऱ्यांनी सैनिकांसाठी शुभेच्छा पत्रे तयार न करणे हा सैनिकांप्रती अनादर दाखवण्याचा प्रकार असून वरिष्ठांचे आदेश न मानणे हा सुद्धा बेशिस्तीचा भाग असल्याचे अलका त्यागी यांचे म्हणणे आहे. ज्या अधिकाऱ्यांनी उत्तम शुभेच्छा पत्रे केली अशा पाच अधिकाऱ्यांचे कौतुक अलका त्यागी यांनी केले आहे.

या संदर्भात एका प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने आम्ही सर्व अभ्यासक्रमात व्यस्त असल्याने त्यात अंतिम परीक्षा असल्याने ही शुभेच्छा पत्रे तयार करू शकलो नाही. पण असले उपक्रम अधिकाऱ्यांवर का थोपवावेत, आम्ही शाळेतले विद्यार्थी आहोत का? असा सवाल केला आहे.

अलका त्यागी कोण?

१९८४च्या भारतीय महसूल सेवेत निवड झालेल्या अलका त्यागी यांची गेल्या वर्षी नागपूरस्थित नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. त्या अगोदर अलका त्यागी यांनी आयसीआयसीआय बँकेंच्या माजी संचालक चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची आयसीआयसीआय बँक घोटाळा व जेट एअरवेजच्या प्रकरणाचा तपास केला होता.

गेल्या वर्षी अलका त्यागी यांनी प्रत्यक्ष कर केंद्रीय मंडळाचे (सीबीडीटी) प्रमुख पी. सी. मोदी यांच्यावर एका प्रकरणात टीका केली होती. प्राप्तीकर खात्याकडे असलेल्या अत्यंत संवेदनशील प्रकरणांचा व ज्या प्रकरणात गंभीर आरोप आहेत अशांचा तपास खोलात जाऊन करू नये, अशा सूचना पी. सी. मोदी आपल्याला देत आहेत, असा आरोप करून अलका त्यागी यांनी खळबळ माजवली होती. हा आरोप म्हणजे मोदी सरकारमधील आर्थिक घोटाळे बाहेर काढू नका असे वरून आदेश आले आहेत, या संदर्भात होता. अलका त्यागी यांच्या या आरोपामुळे काही दिवसांत त्यांची बदली करण्यात आली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: