भारतात इस्लामोफोबियाचे घातक रूप

भारतात इस्लामोफोबियाचे घातक रूप

नवी दिल्लीः पश्चिम आशियातले इस्लामविषयक भीती पसरवण्याचे (इस्लामोफोबिया) प्रयत्नांचे सर्वात घातक परिणाम भारतात दिसत असून भारतातील मोदी सरकार सुनियोजितर

५० वर्षांत भारतात ४ कोटी ५८ लाख महिला ‘बेपत्ता’
लॉकडाऊन -४ मध्येही बुडाला पारंपरिक मच्छिमार
स्त्रीला पिंजऱ्यात ठेवणे हिंसकच!

नवी दिल्लीः पश्चिम आशियातले इस्लामविषयक भीती पसरवण्याचे (इस्लामोफोबिया) प्रयत्नांचे सर्वात घातक परिणाम भारतात दिसत असून भारतातील मोदी सरकार सुनियोजितरित्या देशातील धर्मनिरपेक्ष लोकशाही नष्ट करत भारताला हिंदू राष्ट्र करत असल्याचे मत प्रख्यात विचारवंत व भाषातज्ज्ञ नोम चॉम्स्की यांनी व्यक्त केले आहे. भारतातील कट्टरतावाद  या विषयासंदर्भात चॉम्स्की यांनी आपले मत पाठवले होते. या विषयावरच्या चर्चेत भारतातील वाढती विद्वेषपूर्ण वक्तव्ये व हिंसा हा मुद्दा आला होता. या कार्यक्रमाच्या वक्त्त्यांच्या यादीत कारवाँ-ए-मोहब्बत या संस्थेचे सदस्य हर्ष मंदर होते. द टेलिग्राफने या संदर्भात वृत्त दिले आहे.

चॉम्स्की यांनी अत्यंत संक्षिप्तपणे काश्मीरमधील बिघडलेली परिस्थिती, मुक्त विचार व शैक्षणिक प्रणालीवर सुरू असलेले हल्ले आदी मुद्द्यांना स्पर्श केला. काश्मीर हा आता अधिकृत प्रदेश झाला असून तो काही संदर्भ पाहता पॅलेस्टाइनसारखा अधिकृत प्रदेश झाल्याचे सांगितले.

या दरम्यान मंदर यांनी भारतातील परिस्थिती वेगाने बिघडत चालली असून देशातील वातावरण घृणा व हिंसात्मक होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ज्या विचारसरणीने म. गांधींची हत्या केली, त्या विचारधारेचे सरकार आज भारतात सत्तेवर असून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नेत्यांनी भारताची उभारणी पाकिस्तानसारखी धर्मावर होऊ नये याची काळजी घेतली होती, याची आठवण करून दिली.

या कार्यक्रमात संसद सदस्य व राजकीय नेते उपस्थित नव्हते. मात्रवभारताच्या परराष्ट्र खात्याकडून मत मागवण्यात आले होते पण त्यांच्याकडून तसे काही उत्तर आले नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0