वसाहतवादविरोधी भारतीयांनी पॅलेस्टाइनला पाठिंबा दिलाच पाहिजे!

वसाहतवादविरोधी भारतीयांनी पॅलेस्टाइनला पाठिंबा दिलाच पाहिजे!

१५ मे नाकबा दिवस होता. हा दिवस दरवर्षी पॅलेस्टाइनमधील वांशिक शुद्धीकरणाच्या आरंभाचे स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो. ज्यू झिओनिस्टांनी १९४८ मध्ये इस्र

देशभंजक नायक
अफगाणिस्तान : जी ७ देशांची तातडीची बैठक
जॉन्सन यांच्या जहाजाच्या तळात भोक पडलंय!

१५ मे नाकबा दिवस होता. हा दिवस दरवर्षी पॅलेस्टाइनमधील वांशिक शुद्धीकरणाच्या आरंभाचे स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो. ज्यू झिओनिस्टांनी १९४८ मध्ये इस्रायल नावाची वसाहत स्थापन केली तेव्हा ही प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया कधी संपलीच नाही.

२००९ मध्ये मी नॅब्लसच्या अन-नजफ युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते, तेव्हा वेस्ट बँक व पूर्व जेरुसलेममधील कुटुंबांकडे माझे बरेच जाणे-येणे होते. त्यांच्यासोबत मी बराच वेळ घालवला. याच पॅलेस्टिनी कुटुंबांना त्यांच्या घरांमधून हुसकावण्यात आले आहे. मी तेथे होते तेव्हाही इस्रायलींना (बहुतेक अमेरिकेत स्थायिक झालेले) एकेकाळच्या त्यांच्या घरांचा ताबा घेता यावा म्हणून काही पॅलेस्टिनी कुटुंबांना बेघर केले जात होते. ओल्ड सिटी ऑफ जेरुसलेममधील जाबर कुटुंब, अक्रबामधील अनास कुटुंब आणि जेरुसलेममधील शेख जराह भागातील अल-कुर्द कुटुंब अशा कितीतरी कुटुंबांना इस्रायलींद्वारे होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनांचा तसेच आक्रमकतेचा प्रतिकार करताना मी स्वत: बघितले आहे. इस्रायलींनी त्यांचे घरे उद्ध्वस्त केली असता, ही पॅलेस्टिनी कुटुंबे तंबूत राहत होती पण आपली जागा सोडून जात नव्हती.

हा नक्बा सुरूच आहे. आणि पॅलेस्टाइनमधील आत्ताच्या बंडामागील कारण हेच आहे. मी जेरुसलेममध्ये ज्या अल-कुर्द कुटुंबाला दहा वर्षांपूर्वी भेटले होते, त्यांचा आपली भूमी व शेख जराहमधील घर न सोडण्याचा संघर्ष अद्याप सुरूच आहे. त्यांच्या संघर्षाच्या सोशल मीडियावरील कव्हरेजने या बंडाची सुरुवात झाली.

मात्र, ज्या क्षणी इस्रायली लष्कराने अल-अक्सावर आक्रमण केले आणि गाझामधील पॅलेस्टिनींनी इस्रायलवर रॉकेट्स डागणे सुरू केले, त्या क्षणी भारतातील व जगभरातील माध्यमांसाठी ही मथळ्याची बातमी झाली. वांशिक शुद्धीकरणाच्या कहाणीला तळटिपेची जागा मिळाली. हमास हा चर्चेचा मुख्य विषय झाला. मात्र, जेव्हा पॅलेस्टाइनमधील नागरिक निषेधासाठी रस्त्यावर उतरले तेव्हा हा केवळ इस्रायल व हमासमधील संघर्ष आहे ही कहाणी जगापुढे रेटणे इस्रायलसाठी कठीण झाले. वेस्ट बँकमधील बेथलेहेम आणि नॅब्लससारख्या शहरातील पॅलेस्टिनी, इस्रायलमधील पॅलेस्टिनी, पॅलेस्टाइमधील लीड व जाफा शहरातील तसेच जगभरातील पॅलेस्टिनी (यातील अनेक १८४८ सालापासून निर्वासितांचे आयुष्य जगत आहेत) एकत्र आले आहेत आणि आत्ता चाललेले नाकबा अर्थात विस्थापन थांबवा अशी मागणी ते एकमुखाने करत आहेत.

आता भारतातील व जगभरातील लोकांना या घटनांचा संदर्भ अधिक स्पष्टपणे कळू लागलेला आहे असे दिसत आहे. हा दोन समान बाजूंमधील “संघर्ष” नाही. हे “नागरी युद्ध”, “दंगल” किंवा “सामूहिक हिंसाचार”ही नाही. हा वसाहतवादाच्या विरोधातील लढा आहे. हा वर्णभेदाविरोधातील लढा आहे. पॅलेस्टिनी आणि दक्षिण आफ्रिकी लोक याबद्दल १९६०च्या दशकापासून बोलत आहेत. आता संयुक्त राष्ट्रे आणि ह्युमन राइट्स वॉच व बीत्सेलेमसारख्या मानवी हक्क संघटनांनीही त्याची दखल घेतली आहे.

भाषा आणि साधर्म्य या बाबी महत्त्वाच्या आहेत. भारतीयांना हे पूर्वीच समजले आहे. अगदी अलीकडील काळापर्यंत भारतीय पासपोर्टच्या सुरुवातीच्या पानांवर, वर्णभेदी दक्षिण आफ्रिका किंवा इस्रायलला प्रवास करणे नियमाचे उल्लंघन आहे, असा स्टॅम्प मारला जात होता. वसाहतवादाच्या विरोधातील नॉन-अलाइड मुव्हमेंट अर्थात नामच्या नेतृत्वाची भूमिका भारताने बहुतांशी सोडली आहे हे दुर्दैवी आहे. कृषी ते शस्त्रे सगळ्याच क्षेत्रात इस्रायलशी संपूर्ण आणि स्पष्ट हातमिळवणी नेहमीची झाली आहे. नातेसंबंधांच्या या सामान्यीकरणामुळे (नॉर्मलायझेशन) मूळ भूमिकेचा विसर पडलेले अनेक भारतीय आता वसाहतवाद्यांच्या बाजूने आणि अंकितांच्या विरोधात उभे आहेत.

पॅलेस्टाइनमध्ये आज काय चालले आहे ते समजून घेण्यासाठी काही घटनांकडे तुलनात्मक पद्धतीने बघणे उपयुक्त ठरेल. पॅलेस्टाइनमधील सध्याच्या उठावाची तुलना सोवेटोमध्ये १९७६ साली झालेल्या साउथ आफ्रिकन उठावाशी किंवा १९४४ मध्ये झालेल्या वॉरसॉ घेट्टोशी किंवा भारतात १८५७ मध्ये झालेल्या उठावाशी करून बघावी लागेल. यातील प्रत्येक स्थितीत सामान्य लोकांनी स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सत्ताधाऱ्यांशी लढण्याचा निर्णय केला होता. ब्रिटिशांनी १८५७च्या उठावावर “शिपायांचे बंड” असा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला हे आपला इतिहास वाचलेल्या भारतीयांना माहीत असेल. इंग्रजांच्या मते भारतीयांचा उठाव म्हणजे अंतर्गत बंड होते, परकीयांविरोधातील उठाव नव्हताच.

पॅलेस्टाइनमध्ये काय चालले आहे हे दूरवरून जाणून घेताना, हैफा, जाफा आणि लीड या शहरांत इस्रायली वसाहतवाद्यांनी पॅलेस्टिनींना इस्रायली पोलिसांच्या पाठिंब्याने कसे चिरडले आहे, हे बघून मला धक्का बसला आहे. माझ्या कुटुंबाने १९व्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेकडे पलायन करण्याआधी पूर्व युरोपमध्ये ज्या दहशतीचा अनुभव घेतला त्याबद्दल मी ऐकले आहे आणि ही दहशत त्याच प्रकारची वाटत आहे. त्यावेळी ज्यू समुदायांना लक्ष्य करून झालेल्या हत्याकांडांचे वर्णन, पोग्रोम अर्थात वांशिक शिरकाण या यिड्डीश शब्दाद्वारे, केले जाते. या आठवड्यात इस्रायलींनी पॅलेस्टिनींविरोधात केलेल्या हिंसेसाठी पॅलेस्टिनींनी असाच काही शब्द वापरला तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. त्या जोडीला इस्रायली पॅलेस्टिनींची देशभरातील दुकाने उद्ध्वस्त करत आहेत अशी दृश्ये दाखवली जात आहे. ही दृश्य क्रिस्टॉनाश्टची (नाझींनी १८३८ मध्ये घडवून आणलेल्या दंगलीतील नाइट ऑफ ब्रोकन ग्लास) आठवण ही दृश्ये जागी करत आहेत. जमिनीवर पडलेल्या काचांच्या खचामुळे हे विशेषत्वाने होत आहे. पॅलेस्टिनी या क्रौर्याचा प्रतिकार करत आहेत, त्या विरोधात उभे राहत आहेत, त्यामुळे त्यांचा संघर्ष अधिक शक्तिशाली झाला आहे.

इतिहासाच्या या पुनरावृत्तीमुळे काही बाबी स्पष्ट झाल्या पाहिजेत. दक्षिण आफ्रिकेत १९४८ ते १९९४ या काळात झालेल्या संघर्षाने ज्याप्रमाणे वंशवादी वसाहतवादाला पूर्णविराम दिला, त्याप्रमाणेच पॅलेस्टिनींनीही कृती केली पाहिजे. अत्याचारी सत्तेला प्रश्न विचारण्याच्या या उद्दिष्टाला जगभरातून प्रतिसाद मिळावा म्हणून यासारख्या विशिष्ट तुलना आवश्यक आहेत. म्हणूनच पॅलेस्टिनी, इस्रायलवर बहिष्कार घाला, तेथील गुंतवणूक काढून घ्या, त्यांच्यावर निर्बंध घाला (बीडीएस) अशी मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे गेल्या १५ वर्षांपासून करत आहेत. भारतीय समाजातील काही विशिष्ट वर्गांनी बीडीएसमध्ये सक्रिय सहभाग घेतला असला, तरी मुख्य प्रवाहापासून ते खूप दूर आहेत. आणि म्हणूनच पॅलेस्टिनी बहिष्कार चळवळ भारताशी जवळून जोडलेली आहे. विशेषत: काश्मीरमध्ये भारत इस्रायली शस्त्रांचाही वापर करत आहे आणि डावपेचांचाही.

भारतीयांनी पॅलेस्टाइनकडे अधिक बारकाईने बघण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला जोडणारे दुवे ओळखा आणि कृती करा. ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात घडलेल्या वसाहतवादी गुन्ह्यांना विरोध करण्याचे तत्त्व ज्यांनी अंगिकारले असेल, त्यांनी पॅलेस्टाइनच्या किंवा जगात अन्यत्र कोठेही चाललेल्या वसाहतवादविरोधी लढ्याला पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे.

मॅर्सी न्यूमन, या पॉलिटिक्स ऑफ टीचिंग पॅलेस्टाइन टू अमेरिकेन्स या पुस्तकाच्या लेखिका आहेत आणि अकॅडमिक अँड कल्चरल बायकॉट ऑफ इस्रायल या अमेरिकेतील चळवळीच्या संस्थापक सदस्य आहेत.

मूळ लेख:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0