नेत्यान्याहूंच्या विरोधात जेरुसलेममध्ये तीव्र निदर्शने

नेत्यान्याहूंच्या विरोधात जेरुसलेममध्ये तीव्र निदर्शने

कोरोना विषाणू महासाथीमुळे उद्घभवलेली परिस्थिती हाताळण्यास अपयश आल्याच्या असंतोषातून शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या विरोधात

सोशल मीडियात बदनामी, केरळमध्ये थेट तुरुंगावास
लॉकडाऊन सुरूच, सरकारमध्ये गोंधळ
न्यायाधीशाची हत्याः २४३ जण ताब्यात, २५० रिक्षा जप्त

कोरोना विषाणू महासाथीमुळे उद्घभवलेली परिस्थिती हाताळण्यास अपयश आल्याच्या असंतोषातून शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या विरोधात जेरुसलेममध्ये तीव्र निदर्शने झाली.

सुमारे १५ हजारांचा जमाव जेरुसलेमच्या रस्त्यावर आला आणि त्यांनी नेत्यान्याहू यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. तुमचा कार्यकाल संपत आला आहे, गुन्हेगार मंत्री अशा मजकुराचे फलकही आंदोलकांच्या हातात होते. भ्रष्टाचाराची चौकशी नेत्यान्याहू टाळत असल्याचाही निदर्शकांचा आरोप होता.

REUTERS/Ronen Zvulun

सुमारे १ हजार निदर्शक सिझरिया भागातील नेत्यान्याहू यांच्या बीच हाऊसच्या परिसरातही जमा झाले व तेथे त्यांनी तीव्र निदर्शने केली. देशात अन्यत्र निदर्शनेही झाल्याचे वृत्त आहे.

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याच्या कारणावरून गेले महिनाभर दर आठवड्याला इस्रायलमध्ये ठिकठिकाणी निदर्शने होत आहे. कोरोनाच्या महासाथीमुळे इस्रायलची अर्थव्यवस्थाही धोक्यात आली आहे. मे महिन्यात देशात अंशतः लॉकडाऊन उठवण्यात आला होता पण त्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली.

नेत्यान्याहू कोरोना व आर्थिक परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी ठरत असल्याचेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यात त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप लागल्याने जनमत संतप्त झाले आहे. दरम्यान सत्ताधारी लिकूड पार्टीने मात्र देशातील परिस्थिती पूर्वपदावर येईल व सरकारने नागरिकांना आर्थिक मदत दिली आहे, असा दावा केला आहे. जी निदर्शने रस्त्यावर केली जात आहेत ती डाव्या संघटना व अराजकतावाद्यांकडून केली जात आहेत, असाही लिकूडचा आरोप आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0