इस्रोच्या नव्या वर्षातल्या मोहिमा – ‘चंद्रयान-३’, ‘गगनयान’

इस्रोच्या नव्या वर्षातल्या मोहिमा – ‘चंद्रयान-३’, ‘गगनयान’

नवी दिल्ली : इस्रोने नव्या वर्षात ‘चंद्रयान-३’ व ‘गगनयान’ या दोन अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहिमा जाहीर केल्या आहेत. या व्यतिरिक्त अन्य २५ मोहिमाही इस्रो

‘विक्रम’चा पत्ता लागला : इस्रो
इस्रोच्या इतिहासात ‘चांद्रयान-२’ व्यतिरिक्त आणखी एका यशाची नोंद
चांद्रयान-२ घेऊन जाणाऱ्या रॉकेटच्या प्रक्षेपणात बाधा

नवी दिल्ली : इस्रोने नव्या वर्षात ‘चंद्रयान-३’ व ‘गगनयान’ या दोन अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहिमा जाहीर केल्या आहेत. या व्यतिरिक्त अन्य २५ मोहिमाही इस्रोकडून राबवल्या जाणार आहेत. ‘चंद्रयान-३’ व ‘गगनयान’साठी ६०० कोटी रु. खर्च येणार आहे.

इस्रोचे संचालक के. सिवन यांनी मंगळवारी ‘चंद्रयान-३’ मोहिमेची माहिती देताना, या मोहिमेची पूर्व तयारी सुरू असून ‘चंद्रयान-२’ मोहिमेसारखे याही मोहिमेत एक लँडर, रोव्हर असेल पण त्यात ऑर्बिटर नसेल असे स्पष्ट केले. या मोहिमेला केंद्र सरकारने मंजुरीही दिल्याचे त्यांनी सांगितले.

‘गगनयान’ २०२२मध्ये

‘गगनयान’ मोहिमेंतर्गत चार अंतराळवीर अवकाशात पाठवण्यात येणार आहेत. या अंतराळवीरांची नावे निश्चित झाली हे सर्व अंतराळवीर भारतीय हवाईदलातील अधिकारी आहेत. या मोहिमेवर बरेचसे महत्त्वाचे काम व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत, असे सिवन यांनी सांगितले. या अंतराळवीरांनी प्रशिक्षणासाठी रशियात पाठवण्यात येणार आहे. गेल्या डिसेंबरमध्ये १२ ‘गगनयात्रीं’चे नावे निश्चित झाली होती. या पैकी सात जणांना रशियात पाठवले जाणार आहे तर अन्य अंतराळवीरांना दुसऱ्या टप्यात पाठवले जाणार आहे. ही मोहीम २०२२मध्ये प्रत्यक्ष हाती घेण्यात येणार आहे. भारताचे ४ अंतराळवीर ७ दिवस अवकाशात राहणार आहेत.

इस्रो स्वत:चा दुसरा अवकाश तळ तामिळनाडूतील थुथूकुडी येथे उभा केला जाणार आहे, अशीही माहिती सिवन यांनी दिली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: