भारतातर्फे ऑस्करसाठी ‘जल्लीकट्टू’ची शिफारस

भारतातर्फे ऑस्करसाठी ‘जल्लीकट्टू’ची शिफारस

नवी दिल्लीः अमेरिकेत होणार्या आगामी ९३ व्या अकादमी पुरस्कारासाठी (ऑस्कर) भारतातर्फे मल्याळी चित्रपट ‘जल्लीकट्टू’ची शिफारस फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (ए

बोचरा थट्टापट : बोराट
दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन
आजी आणि नातवाचं खट्याळ गूळपीठ ‘मिनारी’

नवी दिल्लीः अमेरिकेत होणार्या आगामी ९३ व्या अकादमी पुरस्कारासाठी (ऑस्कर) भारतातर्फे मल्याळी चित्रपट ‘जल्लीकट्टू’ची शिफारस फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (एफएफआय) बुधवारी केली.

आगामी ऑस्कर पुरस्कारासाठी हिंदी, मराठी व अन्य भारतीय भाषेतील २७ उत्तम चित्रपटांची यादी करण्यात आली होती. अखेरीस मल्याळी दिग्दर्शक लिजो जोस पेल्लिसरी यांच्या ‘जल्लीकट्टू’वर शिक्कामोर्तब झाले. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणार्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत शिफारस झालेला चित्रपट असेल.

‘जल्लीकट्टू’ या चित्रपटाची कथा केरळमधल्या आदिवासी समाजातील बैलाच्या पारंपरिक शर्यतीवर आधारित आहे. काही वर्षांपूर्वी बैलांच्या या शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. एका शर्यतीतील बैल एका गावात घुसतो आणि त्याला रोखण्यासाठी एक आदिवासी जमात कसा प्रयत्न करते व त्यातून जनावरापेक्षाही माणसाचे जगणेही किती आत्यंतिक प्राथमिक पातळीवर आहे, त्याचा वेध घेणारा हा चित्रपट असल्याची माहिती एफएफआयचे संचालक राहुल रवैल यांनी दिली.

या चित्रपटाची कथा हरिश यांची असून त्यात अँथनी वर्गीस, चेम्बन विनोद जोस, साबूमॉन अब्बूसमद व सँथी बालचंद्रन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ऑस्करच्या शिफारसीसाठी यंदा अनेक चर्चित चित्रपट होते. त्यात ‘छपाक’, ‘शकुंतला देवी’, ‘छलांग’, ‘गुलाबो सिताबो’, ‘एब अलाय ओ’, ‘द स्काय इज पिंक’, ‘बुलबूल’ व ‘द डिसायपल’ यांचा समावेश होता.

गेल्या वर्षी टोरँटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘जल्लीकट्टू’चे मोठ्या प्रमाणात समीक्षकांनी व प्रेक्षकांनी स्वागत केले होते. विशेषतः दिग्दर्शक पेल्लीसेरी, छायाचित्रणकार गिरीश गंगाधरन व ध्वनी रचना रेन्गनाथ रवी या तिघांची समीक्षकांनी वाहवा केली होती.

पेल्लीसेरी यांना गेल्या वर्षी भारतात आयोजित झालेल्या ५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जल्लीकट्टू’साठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0