पीबल्स, क्वेलोझ आणि मेयर यांना भौतिकशास्त्राचे नोबेल

पीबल्स, क्वेलोझ आणि मेयर यांना भौतिकशास्त्राचे नोबेल

पारितोषक मिळेल अशी अपेक्षा होती का असे विचारले असता पीबल्स म्हणाले, त्यांनी तसे काही नियोजन केले नव्हते.

असे कसे नेहरु? जसे-तसे मोदी!
अमेरिकेला सामाईक स्वातंत्र्य दिनाची आवश्यकता
प्रिय ममता बॅनर्जी, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात?

२०१९ चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषक जेम्स पीबल्स, मायकेल मेयर आणि दिदिए क्वेलोझ यांना “विश्वाची उत्क्रांती आणि ब्रम्हांडातील पृथ्वीचे स्थान समजून घेण्यामध्ये दिलेल्या योगदानाकरिता” देण्यात येत आहे.

अर्ध्या पारितोषकाचे मानकरी असणारे पीबल्स यांना “फिजिकल कॉस्मोलॉजी म्हणजेच भौतिक ब्रम्हांडविज्ञानातील सैद्धांतिक शोधांकरिता हा सन्मान देण्यात आला आहे.” एका वार्ताहर परिषदेतील सादरीकरणानुसार, “त्यांनी विश्वातील कृष्ण घटकांना प्रकाशात आणण्यासाठी सैद्धांतिक साधने विकसित केली,” आणि “त्यांच्या मदतीने ब्रम्हांडविज्ञान हे एक अचूकता असलेले विज्ञान म्हणून उत्क्रांत झाले आणि भौतिक ब्रम्हांडविज्ञान म्हणून प्रगल्भ झाले.”

मेयर आणि क्वेलोझ यांना “सूर्यासारख्या अन्य ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाच्या शोधाकरिता” सन्मानित करण्यात आले. सुमारे ५० प्रकाशवर्षे दूर असलेल्या ५१ पेगसी नावाच्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या या ग्रहाला ५१ पेगसी बी असे नाव देण्यात आले आहे.

द वायरमध्ये पूर्वी आलेल्या एका बातमीनुसार, “त्या वेळी मायकेल मेयर आणि दिदिए क्वेलोझ यांनी एका ग्रहाचा शोध लावला. त्यासाठी त्यांनी तो ग्रह त्याच्या ताऱ्याला कसे डगमगायला लावतो याचा अभ्यास केला – त्या ताऱ्याच्या उत्सर्जनाच्या मोजमापामधील बदलांचा त्यांनी प्रॉक्सी म्हणून वापर केला.

पीबल्स यांनी बिग बँग घटना अगदी सुरुवातीला कशी होती त्याबाबतच्या ज्ञानातही लक्षणीय भर घातली आहे, तसेच कृष्ण ऊर्जा आणि कृष्ण द्रव्य यांच्या सिद्धांतांमध्ये योगदान दिले. जेव्हा त्यांनी २००४ मध्ये शॉ पारितोषक जिंकले होते, तेव्हा त्यांच्या सन्मानपत्रात लिहिले होते, “त्यांनी ब्रम्हांडविज्ञानातील जवळजवळ सर्व सैद्धांतिक तसेच निरीक्षणात्मक अशा दोन्ही आधुनिक शोधांचा पाया रचला व मोठ्या प्रमाणात अंदाजावर चाललेल्या क्षेत्रामध्ये अचूकता आली.”

मेयर आणि क्वेलोझ हे स्विस असून पीबल्स हे कॅनडियन-अमेरिकन आहेत. हे पारितोषक मिळण्याची अपेक्षा होती का असे विचारले असता पीबल्स म्हणाले, त्यांनी याचे नियोजन केले नव्हते. “पारितोषके आनंददायी असतात, त्यांचे महत्त्व वाटते, मात्र ती तुमच्या योजनेचा भाग नसतात,” असे त्यांनी तरुण वैज्ञानिकांना उद्देशून सांगितले. “तुम्हाला विज्ञान भुरळ घालत असेल तरच तुम्ही विज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश करायला हवा.”

आत्तापर्यंत २१२ लोकांना भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले आहे. यापैकी केवळ ३ स्त्रिया आहेत, मारी क्यूरी १९०३ मध्ये, मारिया गोपर्ट-मेयर १९६३ मध्ये आणि डॉना स्ट्रिकलॅंड २०१८ मध्ये. या तीनही स्त्रियांना हे पारितोषक दोन पुरुषांबरोबर सामायिकपणे मिळाले आहे. आजपर्यंत कोणत्याही कृष्णवर्णीय व्यक्तीलाही हे पारितोषक मिळालेले नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0