‘रामभक्त’ गोपाल कट्‌टर उजव्या विचारसरणीशी संबंधित

‘रामभक्त’ गोपाल कट्‌टर उजव्या विचारसरणीशी संबंधित

नवी दिल्ली : जामिया मिलिया विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार करणारा अल्पवयीन मुलगा गोपाल हा उ. प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील जेवार

१९७४ सालचे ‘आंदोलनजीवी’ नरेंद्र मोदी
‘टीआरपी’चा बळी
एल्गार केसमधील आरोपींनी लिहिलेल्या पत्रांची अडवणूक

नवी दिल्ली : जामिया मिलिया विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार करणारा अल्पवयीन मुलगा गोपाल हा उ. प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील जेवार भागातला असल्याची माहिती उघड झाली आहे. गोपालने जामियातील विद्यार्थ्यांना गोळीबार करण्याअगोदर घटनेचे थेट प्रक्षेपण फेसबुकवरून करण्याचा प्रयत्न केला. त्याने फेसबुकवर गोळी चालवण्याआधी ‘शाहीन बाग, खेल खतम’ असे विधान करणारी पोस्टही टाकली होती. त्याच्या अशा हिंसक वर्तनाचे धागेदोरे शोधण्यासाठी त्याच्या फेसबुक अकाउंट गेल्यानंतर असे लक्षात आले की, जुलै २०१८पासून तो आपल्या हातात बंदुका घेऊन फोटो प्रसिद्ध करत होता. त्यात तो स्वत:ला ‘जय हिंदुत्व’ म्हणवून घेत होता. त्याच्या एका पोस्टमध्ये त्याच्या भावाकडेही हातात बंदूक असलेला फोटो आहे. गोपालचा एक फोटो तलवारीचे चुंबन घेणारा आहे, त्यात तलवारीची मूठ धार्मिक कार्यास वापरणाऱ्या कपड्याने बांधलेली दिसते.

गोपालचे फेसबुक अकाउंट

गोपालचे फेसबुक अकाउंट

गोपालने आपल्या अकाउंटवर दीपक शर्मा या आणखी एका शूटरचा फोटो शेअर केला आहे. हा दीपक राष्ट्रीय स्वाभिमान दलाचा संस्थापक असून तो चिथावणीखोर वक्तव्ये करणारा, हिंसक वर्तनाची व्यक्ती असल्याची माहिती काही प्रसार माध्यमातून आलेली आहे. २०१७मध्ये दीपक शर्माने एका अपंग व्यक्तीला मारहाण केल्याचा फोटो ‘मिम’ म्हणून प्रसिद्ध केला होता. पण हा फोटो आपल्या फिल्मचा असल्याचा दावा त्याने केला होता. उ. पोलिसांच्या मते दीपक शर्मा हा उ. प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील आहे.

२५ जानेवारी रोजी दीपक शर्मा याचा बंदुकीसमवेतचा एक फोटो गोपालने आपल्या फेसबुकवर शेअर केला होता. या फोटोखाली त्याने ‘बुलंदीयो पे पहुचना तो मेरी भी चाहत है, पर जल्दी इतनी भी नही की गलत रास्ते चून बैठू’, असे विधान केले आहे.

गोपालचे फेसबुक अकाउंट

गोपालचे फेसबुक अकाउंट

त्याअगोदर १७ जानेवारी रोजी गोपालने आणखी दोन युवकांसह एक फोटो प्रसिद्ध केला असून एकाच्या हातात बंदूक आहे. या फोटोच्या खाली त्याने ‘रे इज्जत खेल में ही नी, जैंल मे भी मिल्या करे भाई, पर वो धारा देखी जा करें, कौनसी लगरी से, जय हिंदुत्व’ असे हरियाणवी भाषेत विधान केले आहे.

१४ जानेवारीला गोपालने हातात बंदुक व काही गोळ्या घेतलेला फोटो फेसबुकवर प्रसिद्ध केला होता. त्यावेळी त्याने ‘हिंदू एकता’ असा नारा देत भाईचारा झिंदाबाद, हिंदू एकता झिंदाबाद असे म्हटले आहे.

गोपालच्या फेसबुकवर अकाउंटमध्ये त्याच्या मित्रांची यादी ३,६१६ इतकी असून त्यात अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचा एक स्थानिक नेता चौधरी जवाहर तालन याचे नाव आहे. तर २९ जानेवारीला गोपालच्या फेसबुक फ्रेंड यादीतील एका मित्राने- ठाकूर विराट भाटी याने ‘कल ही के दिन ३० जनवरी को गोडसे जी ने देश को बचाया था, नाथूराम गोडसे अमर रहे, अशी पोस्ट टाकली होती.

 

गोपालने जेव्हा जामियातील विद्यार्थ्यांवर गोळी झाडली त्याच्यानंतर तासाभराच्या आत त्याच्या फेसबुक अकाउंटची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर त्याचे अकाउंट बंद झाले. हे अकाउंट फेसबुकने बंद केले. या संदर्भात द वायरने फेसबुकशी संवाद साधला असता त्यांनी हिंसाचार करणाऱ्या कोणालाही फेसबुकवर जागा नाही. आम्ही या बंदुकधाऱ्या इसमाचे अकाउंट व त्याची छायाचित्रे काढून टाकली असे सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0