पुरावे नष्ट करण्यासाठी जामियातले सीसीटीव्हीही पोलिसांनी फोडले

पुरावे नष्ट करण्यासाठी जामियातले सीसीटीव्हीही पोलिसांनी फोडले

नवी दिल्ली : जामिया कोऑर्डिनेशन कमिटीने जामिया मिलिया विद्यापीठातील १५ डिसेंबर २०१९चे आणखी एक व्हीडिओ फुटेज प्रसिद्ध केले असून या फुटेजमध्ये पोलिस ग्र

सर्व खाजगी शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे
सीसीटीव्हीतून २४ तास पाळत; साईबाबा यांचा अन्नत्यागाचा इशारा
इंदिरा जयसिंग यांचे सरन्यायाधिशांना पत्र

नवी दिल्ली : जामिया कोऑर्डिनेशन कमिटीने जामिया मिलिया विद्यापीठातील १५ डिसेंबर २०१९चे आणखी एक व्हीडिओ फुटेज प्रसिद्ध केले असून या फुटेजमध्ये पोलिस ग्रंथालयात घुसून विद्यार्थ्यांना जबर मारहाण करत असून अखेरीस दोन पोलिस सीसीटीव्हीही काठी मारून तो फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे.

मकतूब मीडियाने सुमारे ५ मिनिटांचा हा व्हीडिओ सोमवारी प्रसिद्ध केला. या व्हीडिओत विद्यापीठातील ओल्ड रिडिंग हॉलची दृश्ये आहेत. ग्रंथालयातील काही मुले पोलिसांना रोखण्यासाठी दरवाज्याजवळ अभ्यासाचे टेबल लावताना दिसत आहेत. पण पोलिस हा दरवाजा फोडून आत येतात. पोलिसांना पाहिल्यावर काही मुले पोलिसांना हात जोडून बाहेर पडण्याची विनंती करताना दिसतात तर एक महिला सुरक्षा अधिकाऱ्याला पोलिस ग्रंथालयाबाहेर जाऊ देतात. त्यानंतर पोलिस ग्रंथालयातील विद्यार्थ्यांवर जबर लाठीमार करताना दिसतात. या लाठीमारातून सुटका करण्यासाठी मुले डोक्यावर बॅगा घेताना दिसतात. काही मुलांची दरवाजातून सुटका होताना दिसते पण बाहेरून पोलिस पुन्हा विद्यार्थ्यांवर काठ्या मारत असल्याची दृश्ये आहेत. एका विद्यार्थ्याला तर तो गयावया करत असतानाही पोलिस काठीने जबर मारहाण करताना दिसले.

या व्हीडिओच्या अखेरच्या दृश्यात पोलिस आपला चेहरा लपवत सीसीटीव्ही फोडण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

द वायर या व्हीडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. पण मकतूब मीडियाने असा दावा केला आहे की, त्यांच्याकडे एक तासाहून अधिक व्हीडिओ फुटेज आहे. या फुटेजमध्ये ग्रंथालयात विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जबर मारहाण केल्याची दृश्ये असून विद्यार्थ्यांना ग्रंथालयात घुसून मारहाण केली नाही हा दिल्ली पोलिसांचा दावा खोटा आहे, असे मकतूबचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: