निवडणुकांमुळे काश्मीरातील २० पैकी १८ जिल्ह्यांत टुजी इंटरनेट

निवडणुकांमुळे काश्मीरातील २० पैकी १८ जिल्ह्यांत टुजी इंटरनेट

जम्मूः नोव्हेंबर अखेर होणार्या जिल्हा विकास परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये दहशतवाद्यांकडून अशांतता माजवण्याचा प्रयत्न होऊ शकतो असे कारण दाखवत गुरुवारी जम्मू व काश्मीरातील २० जिल्ह्यांपैकी १८ जिल्ह्यांमध्ये टुजी इंटरनेट सेवा देण्याचा निर्णय जम्मू व काश्मीर प्रशासनाने घेतला आहे. ही सेवा अत्यंत अनियमित असल्याने काश्मीरमधील जनतेला येत्या २६ नोव्हेंबरपर्यंत हायस्पीड डेटा सर्व्हिस सेवेचा लाभ घेता येणार नाही. प्रशासनाने गंदरबाल व उधमपूर या दोन जिल्ह्यांमध्ये फक्त हायस्पीड डेटा सर्व्हिस सुरू ठेवली आहे.

पोस्टपेड सीम कार्ड धारकांना इंटरनेट सेवा मिळेल. पण प्रीपेड सीम कार्ड धारकांना मात्र काही अटींची पूर्तता केल्यानंतरच इंटरनेट सेवा मिळेल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

काश्मीरात मॅक बायडिंग फिक्स्ड लाइन इंटरनेट कनेक्टिव्हीटी सेवा मात्र सुरूच राहणार आहे.

या संदर्भात जम्मू व काश्मीर गृहखात्याचे प्रधान सचिव शालिन काब्रा यांनी सांगितले की, २६ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या निवडणुका २८० जिल्हा विकास परिषदा व १३,४०० पंचायत समित्या व नागरी स्थानिक परिषदांसाठी होत असून या निवडणुकांमध्ये दहशतवादी हल्ले व समाजकंटकांकडून निवडणूक प्रक्रिया विस्कळीत केली जाऊ शकते, अशी शक्यता असल्याने हायस्पीड इंटरनेटच्या सेवा केवळ २ जिल्ह्यांपुरत्या मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत.

मूळ बातमी

COMMENTS