जम्मूत लष्कराच्या हवाई तळावर ड्रोन हल्ला

जम्मूत लष्कराच्या हवाई तळावर ड्रोन हल्ला

जम्मूः  येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर रविवारी पहाटे २च्या सुमारास ड्रोनद्वारे दोन स्फोट करण्यात आले. हे दोन स्फोट ५ मिनिटांच्या अंतराने करण्यात आले.

काबुल विद्यापीठात दहशतवादी हल्ला, २५ ठार
इस्रायल दुतावास स्फोटः ४ जणांना जामीन
गृहखात्यानेच अमित शहा यांचा ‘बॉम्ब’चा दावा फेटाळला

जम्मूः  येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर रविवारी पहाटे २च्या सुमारास ड्रोनद्वारे दोन स्फोट करण्यात आले. हे दोन स्फोट ५ मिनिटांच्या अंतराने करण्यात आले. या स्फोटात २ भारतीय जवान जखमी झाल्याचे वृत्त असून हे स्फोट रात्री १.३७ मिनिटे व १.४३ मिनिटांनी झाले. या स्फोटात २ जवानांना किरकोळ दुखापत झाली असली तरी केंद्र सरकारने ही घटना गंभीरतेने घेतली असून लगेचच राष्ट्रीय तपास यंत्रणेची एक टीम घटना स्थळी रवाना झाली. रविवारी रात्री दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू करण्यात आल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

ज्या ठिकाणी पहिला स्फोट झाला तेथील इमारतीच्या छप्पराचे किरकोळ नुकसान झाले असून दुसरा स्फोट मोकळ्या जागेत झाल्याने कोणत्याही सामग्रीचे नुकसान झालेले नाही.

भारतीय हवाई दलाचा हा तळ पाकिस्तानच्या सीमेपासून १६ किमी अंतरावर आहे. हा ड्रोन हल्ला दहशतवादी कृत्य असल्याचे सांगण्यात येत आहे. हा हल्ला पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांकडून असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय हवाई दलाच्या या तळावरून प्रवासी विमानांचीही वाहतूक केली जात आहे. स्फोटाच्या घटनेनंतर घटनास्थळी एअर मार्शल विक्रम सिंह तेथे पोहोचले असून ते चौकशी करणार आहेत.

या तळाचे सर्व नियंत्रण भारतीय हवाई दलाकडे आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: