दहशतवाद्यांसोबत अटक केलेल्या देविंदर सिंगला जामीन

दहशतवाद्यांसोबत अटक केलेल्या देविंदर सिंगला जामीन

नवी दिल्लीः गेल्या जानेवारी महिन्यात हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांसोबत दिल्लीला जात असताना अटक करण्यात आलेले जम्मू व काश्मी

इतिहासात वैश्विकदृष्टी मांडणारा अभ्यासक
लॉकडाऊनमध्ये ३६ लाख नोकरदारांनी पीएफ काढला
कुंभमेळ्यातल्या लाखाहून अधिक कोरोना चाचण्या बनावट

नवी दिल्लीः गेल्या जानेवारी महिन्यात हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांसोबत दिल्लीला जात असताना अटक करण्यात आलेले जम्मू व काश्मीरचे माजी पोलिस उपअधिक्षक दविंदर सिंग व इरफान सैफी मीर या दोघांना शुक्रवारी एका प्रकरणाबाबत पतियाळा हाऊस न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. हे प्रकरण दिल्लीत घातपात घडवून आणण्याबाबत होते.

देविंदर सिंह यांचे अनेक दहशतवाद्यांशी संबंध असून दहशतवाद्यांना मदत करणे, त्यांना साधनसामग्री पुरवणे असे आरोप दिल्ली पोलिसांकडून त्यांच्यावर लावण्यात आले होते. त्याबाबत एनआयएकडूनही तपास सुरू आहे.

देविंदर सिंह यांनी इरफान सैफी मीर याच्या मदतीने दिल्लीत घातपात घडवून आणण्याचे कारस्थान रचले होते, असा दिल्ली पोलिसांचा आरोप होता. पण दिल्ली पोलिसांकडून त्या संदर्भातील आरोपपत्र ९० दिवस झाले तरी दाखल करण्यात आले नव्हते, असा युक्तिवाद देविंदर सिंह यांच्या वकिलांनी केला. या कारणामुळे या दोघांना पतियाळा हाऊस न्यायालयाने जामीन दिला.

पण हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांसोबत दिल्लीत जाण्याच्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत असल्याने त्या प्रकरणात देविंदर सिंह मुख्य आरोपी असल्याने ते आणि इरफान मीरही पोलिस कोठडीत राहतील असे स्पष्ट करण्यात आले.

इरफान मीर यांच्यावर हिज्बुलचा कमांडर नवेद बाबूला मदत केल्याचा आरोप आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: