काश्मीरमध्ये दोन पंडितावर गोळ्या झाडल्या; एकाचा मृत्यू

काश्मीरमध्ये दोन पंडितावर गोळ्या झाडल्या; एकाचा मृत्यू

श्रीनगरः जम्मू व काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात दोन पंडित भावांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. यात एकाचा मृत्यू तर अन्य एक जण जखमी झाला. मृत काश्मीर पं

राकेश अस्थाना लाच प्रकरण : सीबीआयचा ढिला तपास
जाहीर चर्चांची पुस्तकं
देशभरातील १५०० मान्यवर वकील भूषण यांच्या बरोबर

श्रीनगरः जम्मू व काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात दोन पंडित भावांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. यात एकाचा मृत्यू तर अन्य एक जण जखमी झाला. मृत काश्मीर पंडिताचे नाव सुनील कुमार असून जखमीचे नाव पिंटू कुमार आहे. ही घटना मंगळवारी शोपियां जिल्ह्यातल्या चोटीपुरा गावात सफरचंदाच्या एका बागेत घडली. जखमी पिंटू कुमारला त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गेल्या २४ तासात काश्मीर पंडितांवरचा हा दुसरा हल्ला दहशतवाद्यांकडून झाला आहे. सोमवारी स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना बडगाम येथे एका काश्मीर पंडिताच्या घरावर दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. यात करण कुमार सिंह हे जखमी झाले, त्यांना श्रीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे,

दुसरी घटना श्रीनगरमधील बटमालू परिसरात घडली येथे एका पोलिस नियंत्रण कक्षावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. सोमवारी नौहट्टा भागात दहशतवादी व पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सरफराज अहमद हा पोलिस कर्मचारी ठार झाला तर लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी जखमी झाला.

भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव असल्याकारणाने गेले काही दिवस जम्मू व काश्मीरमध्ये पोलिस व अन्य सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही रविवारी व सोमवारी या दोन दिवसांत दोन पोलिस दहशतवाद्यांनी ठार मारले व अन्य दोन नागरिक जखमी झाले आहेत.

गेल्या आठवड्यात ११ ऑगस्टला दहशतवाद्यांनी मोहम्मद अमरेज या श्रमिकाला ठार मारले होते. गेल्या वर्षभरात चार श्रमिकांना, १४ नागरिकांना व ६ सुरक्षा कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांनी ठार मारले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: