दविंदर सिंहवर अखेर एनआयएकडून आरोपपत्र

दविंदर सिंहवर अखेर एनआयएकडून आरोपपत्र

नवी दिल्लीः काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप असलेले जम्मू व काश्मीरचे निलंबित डीएसपी दविंदर सिंह व अन्य ६ जणांवर सोमवारी राष्ट्

मजिठिया, कोरोना व देशोधडीला लागलेली प्रसारमाध्यमे
पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला – शरद पवार
आता ‘व्हीआरडीई’ महाराष्ट्रातून हलवणार ?

नवी दिल्लीः काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप असलेले जम्मू व काश्मीरचे निलंबित डीएसपी दविंदर सिंह व अन्य ६ जणांवर सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोप पत्र दाखल केले आहे.

गेल्या जानेवारीत हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या काही दहशतवाद्यांसोबत दिल्लीकडे जात असताना दविंदर सिंहला अटक करण्यात आली होती.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकार्यांशी संपर्क साधण्याचाही आरोप दविंदर सिंह याच्यावर आहे.

दविंदर सिंह याला अटक होऊन ६ महिने झाल्यानंतर त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात दिल्ली पोलिसांकडून ९० दिवसांत दविंदर सिंह याच्यावर आरोपपत्र दाखल होऊ न शकल्याने त्याची जामीनावर सुटका झाली होती पण अन्य आरोप असल्याने तो तुरुंगातच होता.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात दविंदर सिंह याच्याव्यतिरिक्त हिज्बुलचा कमांडर सैयद नवीद मुश्ताक ऊर्फ नवीद बाबू, या संघटनेचा भूमिगत सदस्य इरफान शफी मीर व रफी अहमद राठोर यांचीही नावे आहेत.

सोमवारी जम्मू न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना राष्ट्रीय तपास यंत्रणेने न्यायालयास सांगितले की, देशाची संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या अधिकार्यांनी दविंदर सिंह याला तयार केले होते व त्याने सीमेवरून हिज्बुलच्या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र मिळवून देण्यात मदत केली होती. दविंदर सिंह हिज्बुल संघटनेमध्ये इतका मिसळून गेला होता की तो या संघटनेतील आपल्या हस्तकांना आश्रय, शस्त्रास्त्र व अन्य रसद मिळवून देत होता.

जम्मू व काश्मीरचे ३७०कलम काढून टाकल्यानंतर या राज्यात अशांतता पसरवण्यासाठी पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयाकडून काही आरोपींना राज्यात पाठवले होते, असा एनआयएचा दावा आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या आरोपपत्रात हिज्बुलचा प्रमुख सैयद सलाउद्दीन, उपप्रमुख आमिर खान, संघटनेचा वित्तीय प्रमुख नजर महमूद, संघटनेचा संचालन प्रमुख खुर्शीद आलम यांचीही नावे आहेत. या सर्वांचा हेतू देशात घातपात व दहशतवादी कारवाया करण्याचा होता, असा एनआयएचा आरोप आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0