जम्मू-काश्मीर, उ. प्रदेश, म. प्रदेशात पत्रकारांवर अधिक हल्ले

जम्मू-काश्मीर, उ. प्रदेश, म. प्रदेशात पत्रकारांवर अधिक हल्ले

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीर, उ. प्रदेश, म. प्रदेश व त्रिपुरा या राज्यात पत्रकारांवर व मीडिया संस्थांवर सर्वाधिक हल्ले झाल्याचा एक अहवाल राइट्स अँड रिस्क

पिगॅससद्वारे हेरगिरी केल्याचा फिनलंड सरकारचा दावा
नागरिकत्त्व कायद्याला विरोध वाढला
‘मोदींमुळे श्रीमंत व गरीब असे दोन भारत जन्मले’

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीर, उ. प्रदेश, म. प्रदेश व त्रिपुरा या राज्यात पत्रकारांवर व मीडिया संस्थांवर सर्वाधिक हल्ले झाल्याचा एक अहवाल राइट्स अँड रिस्क अनॅलिसिस ग्रुप (आरआएजी) या संस्थेने तयार केला आहे. ‘भारतीय प्रेस स्वातंत्र्य २०२१’ अशा नावाच्या अहवालात गेल्या वर्षभरात देशभरात ६ पत्रकारांच्या हत्या झाल्या असून १०८ पत्रकारांवर व १३ मीडिया संस्थांवर हल्ले झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालानुसार जम्मू काश्मीरात (२५) पत्रकार व मीडिया संस्थांवर हल्ले झाले असून त्यानंतर उत्तर प्रदेश (२३), मध्य प्रदेश (१६), त्रिपुरा (१५), दिल्ली (८), बिहार (६), आसाम (५), हरियाणा व महाराष्ट्र (४-४), गोवा व मणिपूर (३-३), कर्नाटक, तामिळनाडू व पश्चिम बंगाल ( प्रत्येकी २ घटना ), आंध्र प्रदेश, छत्तीसगढ़ व केरळ (प्रत्येकी १ घटना) यांचा क्रमांक आहे.

जम्मू-काश्मीरमधील हल्ले हे राज्य प्रशासनाच्या मदतीने केले गेले आहेत तर त्रिपुरातील हल्ल्यांना प्रशासनाचे छुपी मदत आहे. जम्मू-काश्मीर ते त्रिपुरा या राज्यांत प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर हल्ले करण्यात आले. या राज्यात डिजिटल मीडिया आचार संहितेअंतर्गत कारवाई करण्यात आल्या.

आरआरएजीनुसार गेल्या वर्षभरात ८ महिलांना ताब्यात घेण्यात आले होते व त्यांच्या विरोधात फिर्यादी दाखल करण्यात आल्या होत्या. त्याच बरोबर १७ पत्रकारांना अटक करण्यात आले. त्यातील सर्वाधिक पत्रकार जम्मू-काश्मीर (५), महाराष्ट्र, मणिपूर, त्रिपुरा येथून प्रत्येकी दोन, आसाम, छत्तीसगड व हरयाणा येथून प्रत्येकी एका पत्रकाराला अटक करण्यात आली.

२०२१मध्ये पोलिस व अन्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून २४ पत्रकारांवर शारीरिक हल्ले, धमक्या व त्रास देण्याच्या घटना घडल्या. १७ पोलिसांनी पत्रकारांना मारहाण केली.

पत्रकारांवर ईडीमार्फतही कारवाई करण्याचे सरकारचे प्रयत्न होते. यात त्यांच्या घरांवर छापे टाकणे, चौकशीसाठी बोलावणे असे प्रकार होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0