विद्यार्थ्यांच्या विरोधापुढे जेएनयू नमले

विद्यार्थ्यांच्या विरोधापुढे जेएनयू नमले

नवी दिल्ली : जवाहर लाल नेहरु विद्यापीठाच्या (जेएनयू) कार्यकारिणीने वाढवलेली हॉस्टेल शुल्क काही अंशी कमी करण्याचा बुधवारी निर्णय घेतला. नव्या निर्णय

दिल्लीत केजरीवाल यांची हॅटट्रिक ; जनमत चाचण्यांचा निष्कर्ष
गर्भवती सफूरा झरगरची अखेर जामिनावर सुटका
कोरोना – डॉक्टरांना घरे खाली करण्यास घरमालकांचा दबाव

नवी दिल्ली : जवाहर लाल नेहरु विद्यापीठाच्या (जेएनयू) कार्यकारिणीने वाढवलेली हॉस्टेल शुल्क काही अंशी कमी करण्याचा बुधवारी निर्णय घेतला.

नव्या निर्णयानुसार सिंगल रुमचे शुल्क २०० रु. तर डबल रुमचे शुल्क १०० होईल तसेच हॉस्टेलचे डिपॉझिट रक्कम ५,५०० रुपये असेल. त्यावर सेवा कर म्हणून १७०० रुपये असतील. जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतील त्यांना मदत करण्यास जेएनयू प्रशासन राजी झाले आहे.

या अगोदर जेएनयूच्या प्रशासनाने सिंगल रुमचे भाडे २० रु.हून ६०० रु. तर डबल रुमचे भाडे १० रु.हून ३०० रुपये व सेवा कर १७०० रु. इतका ठेवला होता. त्या विरोधात विद्यार्थ्यांचे दोन आठवडे तीव्र आंदोलन सुरू होते.

जेएनयू प्रशासनाचे म्हणणे होते की गेली १९ वर्षे येथील शुल्क वाढवले गेले नाही. या विद्यापीठाला पाणी, वीज व अन्य सेवांवर दरवर्षी १० कोटी रु. बिल येत असते. हा आर्थिक खर्च विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळत असतो. पण तरीही शुल्क वाढ करणे गरजेचे आहे.

प्रशासनाच्या या भूमिकेवर विद्यार्थ्यांचे मत होते की, कोणतेही शुल्क वाढवण्याअगोदर विद्यार्थी संघटनांशी चर्चा करणे आवश्यक होते. ती केली गेली नसल्याने विद्यार्थांना आंदोलन करावे लागले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: