बायोडेटा द्या’, १० सन्मानीय प्राध्यापकांना जेएनयूचे पत्र

बायोडेटा द्या’, १० सन्मानीय प्राध्यापकांना जेएनयूचे पत्र

नवी दिल्ली : जगविख्यात इतिहासकार व जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी प्राध्यापक रोमिला थापर यांच्यासमवेत याच संस्थेचे माजी कुलपती आशीष दत्ता, विख्

कमल हसनचा पक्ष १५४ जागा लढवणार
न्यायाधीशांच्या मूल्यमापनाचे मापदंड
देखणे ते चेहरे
रोमिला थापर

रोमिला थापर

नवी दिल्ली : जगविख्यात इतिहासकार व जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी प्राध्यापक रोमिला थापर यांच्यासमवेत याच संस्थेचे माजी कुलपती आशीष दत्ता, विख्यात शास्त्रज्ञ आर. राजारामन, एचएस गिल, सीके वार्ष्णेय, संजय गुहा, योगेंद्र सिंह, डी. बॅनर्जी, टीके ओम्मेन, अमित भादुडी व शीला भल्ला अशा १० प्राध्यापकांकडून त्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी संस्थेने बायोडेटा मागवला आहे.

जेएनयूचे कुलसचिव प्रमोद कुमार यांनी, ३१ ऑगस्ट रोजी आशीष दत्ता, आर. राजारामन, एचएस गिल, सीके वार्ष्णेय, संजय गुहा, योगेंद्र सिंह, डी. बॅनर्जी, टीके ओम्मेन, अमित भादुडी व शीला भल्ला यांनी वयाची ७५ वी पूर्ण केली असून ‘प्रोफेसर इमेरिट्स’ हे पद स्थायी स्वरुपाचे नसून सन्माननीय प्राध्यापकांकडून त्यांचा बायोडेटा मागण्याचा निर्णय विद्यापीठाच्या कार्यकरिणीचा होता, अशी माहिती दिली.

पण या पत्रावरून एका प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपले नाव उघड केले नाही पण ते म्हणाले, मला असे पत्र एक महिन्यापूर्वी आले होते आणि जेएनयू प्रशासनाने माझ्याकडून बायोडेटा मागितला होता. पण जेव्हा ‘प्रोफेसर इमेरिट्स’ सन्मान मला दिला तेव्हा हा सन्मान कायमस्वरुपी असल्याचे मला तत्कालिन कुलपतींनी सांगितले होते. अर्थात मी माझे उत्तर प्रशासनाला पाठवले असल्याची माहिती त्यांनी दिली.

या वादावर आपली बाजू मांडताना जेएनयू प्रशासनाने असा बायोडेटा मागणे हा कार्यालयीन कामाचा भाग असल्याचे सांगितले. वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या प्राध्यापकांना, ते विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात का, त्यांना विद्यापीठाशी संबंध ठेवण्याची इच्छा आहे का, असे प्रश्न पत्राद्वारे विचारले जातात. अशा पत्राचा उद्देश त्यांचे सन्माननीय पद काढून घेण्याचा नसून तर त्यांच्या कामाची माहिती घेण्याचा असतो आणि असे निर्णय एमआयटी, प्रिन्स्टनसारख्या विख्यात विद्यापीठातूनही घेतले जातात, असे प्रमोद कुमार यांनी सांगितले.

जेएनयूत अध्यापन करून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेल्या शिक्षकांना ‘प्रोफेसर इमेरिट्स’ असा सन्मान दिला जातो. रोमिला थापर यांनी सहा दशके अध्यापन केले असून त्या इतिहास संशोधकही आहेत. त्या १९७० ते १९९१ या काळात जेएनयूत अध्यापन करत होत्या व १९९३ साली त्यांना ‘प्रोफेसर इमेरिट्स’ हा सन्मान दिला होता. त्याचबरोबर माजी कुलपती आशीष दत्ता हे प्रख्यात जीवशास्त्रज्ञ असून त्यांना १९९९मध्ये पद्मश्री तर २००८मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. त्यांना शांतीस्वरुप भटनागर व प्रियदर्शनी पुरस्कारही मिळालेला आहे. प्रा. राजारामन यांनी त्यांची पीएचडी विख्यात नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ हेंन्स बेथ यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. १९६७मध्ये बेथ यांना स्टेलर न्यूक्लियोसिंथेसिसच्या सिद्घांतावर नोबेल पुरस्कार मिळाला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0