नवी दिल्लीः जेएनयू विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू जगदेश कुमार हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन-यूजीसी) नवे संचालक म्हणून नियुक्त
नवी दिल्लीः जेएनयू विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू जगदेश कुमार हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन-यूजीसी) नवे संचालक म्हणून नियुक्त झाले. केंद्रीय शिक्षण खात्याने जगदेश कुमार यांच्या यूजीसीच्या संचालकपदासाठी नियुक्तीची घोषणा केली. जगदेश कुमार यूजीसीचे पुढील पाच वर्षे संचालक म्हणून काम पाहतील.
गेल्या वर्षी ७ डिसेंबरला यूजीसीचे संचालक प्रा. डी. पी. सिंग यांनी वयाची ६५ वर्षे पुरी केली म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ही जागा रिक्त होती. त्या जागी जगदेश कुमार यांना नियुक्त करण्यात आले.
केंद्रीय शिक्षण खात्याने जेएनयूच्या कुलगुरू पदावर अद्याप कोणत्याही नावाची घोषणा केलेली नाही. जगदेश कुमार यांचा जेएनयूचा कुलगुरूपदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ गेल्याच वर्षी संपुष्टात आला होता. पण त्यांना पदावरून मुक्त करण्यात आले नव्हते.
जेएनयूच्या इतिहासात कुलगुरू म्हणून जगदेश कुमार यांची कारकीर्द कमालीची वादग्रस्त झाली होती. जानेवारी २०१६मध्ये पद स्वीकारल्यानंतर अफझल गुरू याला फाशी देण्याच्या मुद्द्यावरून जेएनयूतील विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. ते आंदोलन त्यांना हाताळावे लागले होते.
प्रा. जगदेश कुमार हे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग व संलग्न विषयांचा गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांनी या विषयांत एम.एस. पी.एचडीही मिळवलेली आहे. ते आयआयटी मद्रास येथील स्नातक आहे. या पूर्वी त्यांनी आयआयटी खरगपूर व आयआयटी दिल्ली येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले आहे.
मूळ बातमी
COMMENTS