जेएनयू हिंसाचारः दिल्ली पोलिसांची स्वतःला क्लीनचीट

जेएनयू हिंसाचारः दिल्ली पोलिसांची स्वतःला क्लीनचीट

नवी दिल्लीः गेल्या जानेवारी महिन्यात जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारात दिल्ली पोलिसांनी स्वतःला क्लीनचीट दिली आहे. ५ जानेवारी रोजी जेएनयूच्या कॅम्पसमध्य

दिल्ली पोलिसांनी गाझीपूरचे बॅरिकेड्स हटवले
शेहला रशीद यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाची तक्रार
दिल्लीत पोलिस आणि वकिलांचा संघर्ष रस्त्यावर

नवी दिल्लीः गेल्या जानेवारी महिन्यात जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारात दिल्ली पोलिसांनी स्वतःला क्लीनचीट दिली आहे. ५ जानेवारी रोजी जेएनयूच्या कॅम्पसमध्ये हिंसाचार झाला. स्वतःचे चेहरे झाकलेले काही गुंड जेएनयूच्या कॅम्पसमध्ये घुसले व त्यांनी साबरमती हॉस्टेलमध्ये घुसून काही शिक्षक व विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली होती. गुंडांकडे काठ्या व लोखंडी रॉड होते, या मारहाणीनंतर पोलिसांना बोलावण्यात आले. जेएनयूच्या विद्यार्थी नेत्या आयेशी घोष यांनाही मारहाण करण्यात आली होती. सुमारे ४० हून अधिक जण या मारहाणीत जखमी झाले होते. पण या प्रकरणाची चौकशी करणार्या फॅक्ट फायंडिग कमिटीला दिल्ली पोलिसांचा बेजबाबदारपणा दिसला नाही व त्यांनी दिल्ली पोलिसांना क्लीन चीट दिली. जेएनयू कॅम्पसमध्ये त्या दिवशी दिवसभर वातावरण अस्वस्थ व अस्थिर होते पण पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असे या कमिटीचे मत आहे.

जेएनयू प्रकरणात दिल्ली पोलिस विद्यापीठाच्या आवारात आले नव्हते मात्र जामिया मिलियामध्ये मात्र दिल्ली पोलिस तथाकथित दंगलखोरांना मारण्यासाठी विद्यापीठात प्रशासनाच्या परवानगी शिवाय घुसले होते व तेथे पोलिसांनी ग्रंथालयात जाऊन विद्यार्थ्यांना मारले व ग्रंथालयाची व वसतीगृहाची तोडफोड केली होती.

जेएनयू प्रकरणात पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिल्ली पश्चिमच्या सहआयुक्त शालिनी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती. या कमिटीत चार पोलिस निरीक्षक व दोन पोलिस उपायुक्त अधिकारी होते.

या प्रकरणात अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1