उ. प्रदेशात गुंडांच्या हल्ल्यात पत्रकाराचा मृत्यू

उ. प्रदेशात गुंडांच्या हल्ल्यात पत्रकाराचा मृत्यू

नवी दिल्लीः गुंडांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले गाझियाबाद येथील पत्रकार विक्रम जोशी यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. विक्रम जोशी यांच्या पुतणीची काह

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची खूर्ची जाण्याचे वृत्त दिल्याने संपादकांवर गुन्हा
काश्मीरमध्ये छायाचित्र-पत्रकाराला अटक
सिद्दिक कप्पनचा जामीन अर्ज अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळला

नवी दिल्लीः गुंडांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले गाझियाबाद येथील पत्रकार विक्रम जोशी यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. विक्रम जोशी यांच्या पुतणीची काही गुंडांनी छेड काढल्याने त्यांनी पाच दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार नोंदवली होती.

पोलिसांत तक्रार केल्याच्या कारणावरून विक्रम जोशी आपल्या दोन मुलींसोबत मोटार सायकलवरून जात असताना काही गुंडांनी त्यांना रोखले व दोन मुलींच्या देखत मारहाण केली. मारहाण केल्यानंतर  गुंडांपैकी एकाने जोशी यांच्या डोक्यात गोळीही झाडली आणि सर्वजण पळून गेले. आपल्या वडिलांवर गोळी झाडली म्हणून त्यांच्या मुलींनी मदतीसाठी आक्रोश केला व नंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

या घटनेनंतर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांना जोशी यांच्यावर गोळी झाडल्याचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहे. नंतर पोलिसांनी आणखी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

जोशींवर गोळी झाडल्यानंतर त्यांना तातडीने इस्पितळात नेण्यात आले पण बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले.

जोशी यांच्यावर गोळी झाडणार्या गुंडाचे नाव रवी असून तो प्रताप विहार येथील रहिवासी असून त्याने जोशी यांना मारण्याचा कट रचल्याचे कबूल केले आहे.

आपल्या पुतणीची छेड अनेक दिवस काही गुंड काढत होते, त्यावरून जोशी यांनी या गुंडांना जाब विचारला होता. पण तरीही गुंड ऐकत नसल्याच्या कारणावरून त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती.

पोलिसांनी तक्रार नोंदवल्यानंतर लगेचच कारवाई केली नाही, त्यांना अगोदर ताब्यात घेतले असते तर हे प्रकरण वाढले नसते, असे जोशी यांच्या कुटुंबियांचा म्हणणे आहे. त्यांनी पोलिसांच्या दिरंगाईवरही आरोप केले.

दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून दिरंगाई झाल्याची कबुली गाझियाबादचे सर्कल ऑफिसर राकेश मिश्रा यांनी दिली आहे. महिलांवरच्या अत्याचाराच्या तक्रारी तातडीने हाती घेतल्या जातात. पण या प्रकरणात आरोपींनी जोशी यांच्या नातेवाईकांवर हल्ला केल्याची फिर्याद पोलिसांत दाखल केली होती, असे मिश्रा यांनी सांगितले. हे प्रकरण महिलांवरील अत्याचाराबाबत असल्याने पोलिसांनी त्वरित पावले उचलायला हवी होती, असेही मिश्रा म्हणाले.

या प्रकरणी विजय नगर पोलिस ठाण्याच्या प्रभारींना निलंबित करण्यात आले आहे. तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी उ. प्रदेशात जंगल राज असल्याचा आरोप केला. एक पत्रकार त्याच्या पुतणीची छेड काढतात म्हणून पोलिसांत तक्रार देतात पण त्यांनाच गोळी घालून ठार मारले जाते. अशा परिस्थितीत सामान्य माणूस या जंगलराजमध्ये सुरक्षित आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0