‘द वायर’च्या संपादकांवर फिर्याद; मान्यवरांकडून निषेध

‘द वायर’च्या संपादकांवर फिर्याद; मान्यवरांकडून निषेध

नवी दिल्ली : द वायरचे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांच्याविरोधात उ. प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीचा देशभरातील सुमारे ३५०० नामवंत न्याय

कार्यकर्ते डॉ. लागू
‘निर्बंध नको असतील तर लसीकरण अपरिहार्य, मास्क वापरा’
वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक

नवी दिल्ली : द वायरचे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांच्याविरोधात उ. प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीचा देशभरातील सुमारे ३५०० नामवंत न्यायाधीश, विधिज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, कलाकार, लेखकांनी निषेध केला आहे. या सर्व मान्यवरांनी वरदराजन यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे अशी मागणीही केली आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार लॉकडाऊन सुरू असतानाच्या काळात टपाल सेवा उपलब्ध असतानाही वरदराजन यांना नोटीस देण्यासाठी उ. प्रदेश सरकारने आपल्या पोलिसांना ७०० किमी प्रवास करायला लावला व वरदराजन यांना नोटीस द्यायला लावली.

या नामवंतांनी आपल्या पत्रात प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर होणार्या हल्ल्याचा निषेध करत केंद्र व राज्य सरकारांना आवाहन केले आहे की, त्यांनी कोरोना महासाथीचा फायदा घेऊ नये. सध्या वैद्यकीय आणीबाणी आहे, ती राजकीय स्वरुपाची नाही तेव्हा तिची अंमलबजावणी राजकीय हेतूतून करू नका. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर हल्ला हा अप्रत्यक्ष जनतेला मिळणार्या माहितीचाही संकोच असतो, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये असे या पत्रात म्हटले आहे.

गुन्हा दाखल करण्यामागील कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन पुकारल्यानंतरही उ. प्रदेशात राम नवमीचा सोहळा आयोजित केला होता, त्या सोहळ्यात मुख्यमंत्री आदित्य नाथ उपस्थित राहण्यासंदर्भात प्रश्न विचारले होते. पण उ. प्रदेश सरकारला हे प्रश्न अडचणीचे वाटले आणि हे तथ्यात्मक वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे सिद्धार्थ वरदराजन यांच्याविरोधात उ. प्रदेश सरकारने फिर्याद दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.

या पत्रावर स्वाक्षर्या असणार्यांची नावे पुढील प्रमाणे : मदन लोकूर (सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश), के. चंद्रू (मद्रास हायकोर्टाचे माजी न्यायाधीश), अंजना प्रकाश (पटणा हायकोर्टाचे माजी न्यायाधीश), रामदास व विष्णु भागवत (दोघेही माजी नौदलप्रमुख), यशवंत सिन्हा (माजी अर्थमंत्री), शिवशंकर मेनन (माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार), सुजाता सिंह (माजी परराष्ट्र सचिव), ज्युलिओ रिबेरो (माजी पोलिस महासंचालक, पंजाबच्या राज्यपालांचे माजी सल्लागार व रुमानियातील भारताचे माजी राजदूत), एमएस गिल (माजी निवडणूक आयुक्त).

विक्रम सेठ, नयनतारा सहगल, अरुंधती रॉय, अनिता देसाई, के. सच्चिदानंद व किरण देसाई (सर्व लेखक)

अमोल पालेकर, नसीरुद्दीन शाह, नंदिता दास, फरहान अख्तर, मल्लिका साराभाई, झोया अख्तर, किरण राव, आनंद पटवर्धन (चित्रपट कलावंत)

त्याचबरोबर देशविदेशातील सुमारे एक हजाराहून अधिक प्राध्यापक व ज्येष्ठ पत्रकारांनी स्वाक्षर्या केल्या आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0