‘जस्टीस फॉर जयश्री’

‘जस्टीस फॉर जयश्री’

जयश्रीची बलात्कार करून हत्या केल्यामुळे पुन्हा जातीयवादातून स्त्रियांवर होणार्‍या लैंगिक हिंसाचार, बलात्कार, हत्यासारख्या अमानवीय घटनांना अधोरेखित केले आहे.

इलेक्ट्रोरल बाँडवर जेटलींचा सल्ला मोदींनी मानला
गुजरातमधील हॉस्पिटल अंधार कोठडीपेक्षा वाईट – न्यायालय
भाजपला टाटाकडून ३५० कोटींची देणगी

जयश्री काथिरवेल, तामिळनाडूच्या एच अँड एम फॅशन ब्रँडच्या सप्लायर  असलेल्या नची गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी २० वर्षीय दलित समाजातील मुलगी.

१ जानेवारी २०२१, तामिळनाडूमधील दिंडीगुल जिल्ह्यात जयश्री काथिरवेलची बलात्कार करून हत्या करण्यात आली. तामिळनाडू पोलिसांनी तिच्या फॅक्टरीमधील सुपरवायझर व्ही. थांगदुराईसह अन्य दोन जणांविरुद्ध तिच्यावर बलात्कार आणि हत्या केल्याची माहिती  पोलिस तपासात समोर आली आहे.  सध्या सर्व गुन्हेगार पोलिस कोठडीत आहेत. जयश्रीची बलात्कार करून हत्या केल्यामुळे पुन्हा जातीयवादातून स्त्रियांवर होणार्‍या लैंगिक हिंसाचार, बलात्कार, हत्यासारख्या अमानवीय घटनांना अधोरेखित केले आहे.

२१ एप्रिल रोजी जयश्रीला न्याय मिळवा म्हणून ऑनलाइन ग्लोबल विगल- जस्टीस फॉर जएसरे म्हणून मीटिंग आयोजित केली होती. यामध्ये गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करणार्‍या स्त्रियांना लैंगिक छळ, अश्लील शेरेबाजी, असमान वेतन, कामाचे तास, ओवरटाइम करूनही पैसे वेळेवर न मिळणे, काही वेळा कमी पैसे मिळणे किंवा कधी कधी केलेल्या कामाचे पैसेचे दिले जात नाही अशा सगळ्या मुद्द्यावर ही चर्चा आयोजित करण्यात आली होती.

अन्य देशातही गारमेंट फॅक्टरीमध्ये स्त्रियांना असाच प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागत आहे. कोविडमुळे स्त्रियांच्या रोजगाराची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. नोकर्‍यांमध्ये शाश्वती राहिली नाही. अनेक वेळा स्त्रिया त्यांच्यावर होणार्‍या लैंगिक अत्याचाराबद्दल बदनामी होईल, नोकरीवरून काढून टाकलं तर कुटुंब कसे चालवायच ह्या भीतीने अत्याचार सहन करत असतात. देशात कायदे अस्तित्वात आहेत पण त्यांची माहिती नसणे, कायद्याची अंमलबजावणी यामुळे पीडित स्त्रीला न्याय मिळणे कठीण होऊ जाते.

जयश्रीच्या घटनेनंतर आशिया वेज फ्लोर अलायन्सच्या (Asia Wage Floor Alliance) माध्यमातून नची अ‍ॅपरेलमधील जयश्रीसोबत काम करणार्‍या काही महिला कामगारांसोबत त्यांनी चर्चा केली तेव्हा त्यातील  ७ महिला कामगारांनी सांगितले की, त्यांच्या सुपरवायझरने जयश्रीचा   अनेकदा लैंगिक छळ केला होता. त्यांनी असेही नमूद केले आहे की, सुपरवायझरने यापूर्वीही इतर महिलांवर लैंगिक छळ केल्याचा घटना  आहेत. महिला कामगारांनी हे ही निदर्शनास आणून दिले की,  कारखान्यात लैंगिक छळ आणि हिंसाचाराची बरीच उदाहरणे आहेत – त्यात महिलांना अश्लील नावांनी हाका मारणे, त्यांच्यासोबत गुंडगिरी, मारहाण आणि प्राणघातक हल्ला करण्याच्या घटनाही पूर्वी घडल्या आहेत. आशिया वेज फ्लोर अलायन्सच्या अहवालानुसार थांगदुराई आणि जगन्नाथन यांनी जएसरेचा बलात्कार करून हत्या केल्याचेही  त्यांनी म्हटले आहे.

जयश्रीच्या घटनेनंतर कामाच्या ठिकाणी महिला कामगारांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आपल्या देशात २०१३ कामाच्या ठिकाणी होणार्‍या महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध (प्रतिबंध, बंदी, आणि निवारण) कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्था, मनोरंजनाची आणि खेळाची ठिकाण, शैक्षणिक संकुल अशा सर्व ठिकाणी या कायद्याअंतर्गत महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण अनिवार्य आहे. तरीही आज अनेक ठिकाणी अशा समित्या स्थापन झालेल्या दिसत नाही. जिथे स्थापन झाल्या आहेत तिथे बैठका नियमित होत नाही, असे दिसून येते. हल्ली बहुतांश कार्यालयीन क्षेत्रात अद्ययावत यंत्रणा वापरली जाते. आपल्या कर्मचार्‍यांवर देखरेख ठेवण्यासाठी थम्ब इंप्रेशन, सीसीटीव्ही सारख्या  यंत्रणा वापरल्या जातात. मात्र नची अ‍ॅपरेलमध्ये ज्या ठिकाणी महिला कामगार काम करतात तिथे अशी कोणतीही यंत्रणा दिसून आली नाही असे, आशिया वेज फ्लोर अलायन्सने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.  यामागे कारखान्यात स्त्री कामगाराचा छळ केला जातोय याची कोठेही नोंद होऊ नये असा हेतू कारखानदारांचा शकतो का? ही शंकाही यात उपस्थित केली आहे.

स्त्री कामगारांच्या होणार्‍या लैंगिक शोषणा संदर्भात अज्ञात व्यक्तीने तामिळनाडू टेक्सटाईल अँड कॉमन लेबर युनियनकडे (टीटीसीयू) तक्रार नोंद केल्याची माहिती नमूद केली आहे. पण यावर फारशी दखल घेतली गेली नाही. तसेच कारखान्यामध्ये ९०% सुपरवायझर हे पुरुष आहेत. केवळ १०% स्त्रीया अधिकारीपदावर कार्यरत आहेत. यावरून कारखान्यातील लिंगभाव असमानतेचे प्रमाण दिसून येते. कारखान्यात लिंगगुणोत्तर प्रमाणात प्रचंड तफावत तर आहेच शिवाय  कामगार म्हणून तरुण स्त्री कामगारांचे प्रमाण मोठे आहे. यातील बहुतांश स्त्री कामगार या गरीब घरातील रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या मुली आहेत.

जयश्रीच्या घटनेने रोजगारासाठी घराबाहेर पडणार्‍या, रोजगारासाठी स्थलांतरित होणार्‍या असंख्य मुलीच्या सुरक्षेचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नची फॅशन ब्रँड ही ईस्टमॅन एक्सपोर्ट्स एक कंपनी असून ती भारताची चौथी सर्वात मोठी वस्त्र-निर्यात कंपनी आहे. याठिकाणी महिला तक्रार निवारण समिती, फॅक्टरी अॅक्टनुसार महिला कामगारासाठी असलेल्या सोयीसुविधा देणे क्रमप्राप्त होते.

१९४८मध्ये फॅक्टरीज अ‍ॅक्ट अस्तित्वात आला. या कायद्याचा मूळ हेतू असा आहे की, कारखान्यात नोकरीला असलेल्या कामगारांना आरोग्य, कामाचे तास, सुरक्षितता, वेलफेअर, भरपगारी रजा इत्यादी लाभांची शाश्वती मिळावी व कामगारवर्गाची मालकवर्गाकडून पिळवणूक होऊ नये. शिवाय भारताने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे स्त्री-पुरुष कामगारांना समान वेतन करार १९५१,  कामगारांची सामाजिक सुरक्षा करार १९५२, C111 Discrimination (Employment and Occupation) Convention, 1958 , C111 Discrimination (Employment and Occupation) Convention, 1958 , C118 Equality of Treatment (Social Security) Convention, 1962, C156 Workers with Family Responsibilities Convention, 1981 , C183 Maternity Protection Convention, 2000 मान्य केले आहेत. पण मूळ मुद्दा अंमलबजावणीचा आहे.

एकंदरीतच जगभरात गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करणार्‍या स्त्रियांची स्थिती हा चिंतेचा विषय आहे.

१९०९ मध्ये महिला दिन साजरा करण्याची सुरुवात झाली होती ती मुळात वस्त्र कारखान्यात काम करणार्‍या स्त्री कामगारांच्या कामाचे तास, समान वेतन या हक्कासाठी. १९०९ ते २०२१ मध्ये गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करणार्‍या स्त्रियांचे प्रश्न तेच आहेत. फक्त स्वरूप काय बदलेल तर कायदा अस्तित्वात आला मात्र कायद्याचे अस्तित्व स्त्रियांचे प्रश्न, स्त्री कामगार म्हणून कारखान्यात सुरक्षित वातावरण, समान वेतन यासाठी आजही स्त्रियांना झगडावे लागत आहे. गेल्या वर्षभरापासून असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या सर्व क्षेत्रातील स्त्रियांची उपजीविका टाळेबंद झाली आहे. ज्या स्त्रिया काम करत आहे, त्यांना त्यांच्या वेतनामध्ये आणि कामाच्या तासांमध्ये तडजोड करावी लागत आहे.

इंटरनॅशनल लेबर राइट्स फोरमच्यावतीने ‘JUSTICE FOR JEYASRE’ ही मोहीम सुरू केली आहे. यामध्ये जएसरेला न्याय मिळण्यासाठी आशिया फ्लोर वेज अलायन्स, मानवाधिकार संघटना, तामिळनाडू टेक्सटाईल अँड कॉमन लेबर युनियन, स्वतंत्र कामगार संघटना आदी सहभागी झाल्या आहेत.

यामध्ये काही मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या आहेत त्यापुढील प्रमाणे :

  • काथिरवेल कुटुंब आणि जयश्रीच्या सहकारी महिलांच्या जीवाला धोका आहे यासाठी एच अँड एमने त्यांना संरक्षण द्यावे..
  • एच अँड एमने टीटीसीयू या कामगार संघटनेची मान्यता स्वीकारून नची अ‍ॅपरलमधील कामगारांच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले पाहिजे.
  • एच अँड एमने स्वत:ला यातून वगळू नये आणि बाहेर पडल्याचा प्रयत्नही करू नये.
  • एच अँड एमने कारखान्यात होणारे लैंगिक छळाचे प्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधनात्मक पाऊले उचलली नाहीत तसेच कारखान्यामधील अंतर्गत ऑडिट व्यवस्थाही कुचकामी ठरली तसेच यापूर्वी घडलेल्या लैंगिक छळाच्या घटनेकडे लक्ष देण्यास अपयशी ठरलो हेही मान्य करावे.
  • नची अ‍ॅपरलमधील सर्व कामगारांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी टीटीसीयू युनियनच्या सहभागाने ब्रँड्स आणि त्यांचे सप्लायर, इस्टरमॅन एक्सपोर्ट यांच्यामधील पुरवठा साखळी मॉडेल संपविण्यासाठी समावेश करून लेखी करार व त्याची अंमलबजावणी करावी म्हणजे लिंगभेदावर आधारित होणारा हिंसाचार रोखण्यास मदत होईल.

एकंदरीत  पुरवठा साखळीचे मॉडेल संपविण्यासाठी टीटीसीयू युनियन, ब्रँड्स आणि त्यांचे सप्लायर, इस्टरमॅन एक्सपोर्ट यांचा समावेश असलेल्या अंमलबजावणी व बंधनकारक कराराद्वारे नची अ‍ॅपरलमधील सर्व कामगारांचे संरक्षण केले जाणे आवश्यक आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0