सीपीएम नेत्या शैलजा टीचर यांनी मॅगसेसे पुरस्कार नाकारला

सीपीएम नेत्या शैलजा टीचर यांनी मॅगसेसे पुरस्कार नाकारला

केरळच्या माजी आरोग्य मंत्री आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या केके शैलजा यांनी सांगितले, की त्यांनी हा पुरस्कार नाकारला कारण त्यांना हा पुरस्कार घेण्यात वैयक्तिकरित्या कोणताही रस नाही.

गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला
२२ हजार भारतीयांचे अमेरिकेकडे शरणागतीचे अर्ज
जेएनयूच्या वादग्रस्त कुलगुरूंकडे यूजीसीचे संचालकपद

तिरुअनंतपुरम/नवी दिल्ली: केरळच्या माजी आरोग्य मंत्री आणि सीपीआय(एम) च्या ज्येष्ठ नेत्या केके शैलजा यांनी रॅमन मॅगसेसे पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे, कारण फिलीपाईन्सचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे हे कम्युनिस्टांविरुद्धच्या कथित क्रूरतेसाठी ओळखले जात होते.

सीपीआय(एम)च्या केंद्रीय समिती सदस्य शैलजा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेतला. शैलजा यांनी केरळमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले, “मला हा पुरस्कार घेण्यामध्ये वैयक्तिक रस नसल्याने हा पुरस्कार नाकारला.”

केरळच्या माजी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, की, त्यांच्या कामाचा पुरस्कारासाठी विचार करण्यात आला होता, जो प्रत्यक्षात एक सामूहिक प्रयत्न होता आणि वैयक्तिकरित्या तो (पुरस्कार) घेणे त्यांच्यासाठी योग्य नाही.

रविवारी, काही माध्यमांनी वृत्त दिले की केके शैलजा यांनी पक्षाशी सल्लामसलत केल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता.

शैलजा म्हणाल्या, “कदाचित गैरसरकारी स्वयंसेवी संस्था (एनजीओ) कम्युनिस्ट विचारसरणीच्या बाजूने नसतील. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून मला हा पुरस्कार घेणे योग्य वाटत नाही. कारण मला हा पुरस्कार ज्या गोष्टीसाठी मिळत आहे, ते खरोखर सामूहिक प्रयत्न होते. त्यामुळे हा पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला.”

त्या म्हणाल्या, “मी त्यांचे आभार मानले आणि पुरस्कार स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला, कारण मला वैयक्तिकरित्या तो स्वीकारण्यात रस नाही.”

रॉकफेलर ब्रदर्स फंड (RBF) ने १९५७ मध्ये फिलीपाईन्सच्या दिवंगत राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ रॅमन मॅगसेसे पुरस्काराची स्थापना केली, ज्यांचे मार्च १९५७ मध्ये विमान अपघातात निधन झाले. सरकारी सेवा, सार्वजनिक सेवा, आंतरराष्ट्रीय समज, पत्रकारिता आणि साहित्य आणि सामुदायिक नेतृत्व यातील योगदानासाठी फिलिपाइन्स तसेच इतर आशियाई देशांतील नागरिकांना हा पुरस्कार दिला जातो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0