कमलनाथ सरकारचे भवितव्य आज ठरणार

कमलनाथ सरकारचे भवितव्य आज ठरणार

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारला आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आपले बहुमत विधानसभेत सिद्ध करून दाखवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाचा संघराज्य तत्त्वावर पुन्हा घाला?
महाराष्ट्रात करोनाचे ११ रुग्ण, विदेशी नागरिकांना देशात बंदी
बाबरी कटातील कल्याणसिंगाची भूमिका काळाच्या पडद्याआड

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारला आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आपले बहुमत विधानसभेत सिद्ध करून दाखवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कोणत्याही सरकारला आपले  विधानसभेतील बहुमत सिद्ध करून दाखवावे लागते व पर्याप्त सदस्य संख्या सरकारच्या बाजूची असल्याचे सांगावे लागते. हाच योग्य पर्याय असल्याने कमलनाथ सरकारने या एकाच अजेंड्यावर बहुमत सिद्ध करावे असे न्यायालयाने सांगितले.

हे बहुमत सिद्ध सात निर्देश न्यायालयाने दिले आहेत, त्यानुसार विधानसभेत हात वर करून मतदान घ्यावे, मतदानाचे व्हीडिओ चित्रण व्हावे व त्याचे थेट प्रक्षेपण केले जावे, मतदान शांततेत व्हावे, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान व्हावे, कर्नाटकात असलेल्या १६ बंडखोर काँग्रेस आमदारांनी संरक्षण मागितल्यास त्यांना तसे संरक्षण म. प्रदेश आणि कर्नाटकच्या पोलिसांनी द्यावे, असे नमूद केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: