पोलिस व राजकीय नेत्यांच्या भ्रष्ट युतीचे दुबेला संरक्षण

पोलिस व राजकीय नेत्यांच्या भ्रष्ट युतीचे दुबेला संरक्षण

१५० हून गंभीर गुन्ह्याची नोंद असूनही विकास दुबे हा उ. प्रदेश पोलिसांच्या टॉप टेन मोस्ट वाँटेड क्रिमिनल यादीत अद्याप समाविष्ट नाही.

राजस्थानात दलित मुलीवर पोलिस कोठडीत बलात्कार
‘जम्मू-काश्मीर’मध्ये ‘गुपकार’ला सर्वाधिक जागा
मुजफ्फरपूर – सामाजिक विषमतेचे बळी

गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री विकास दुबे व त्याच्या काही साथीदारांनी एका चकमकीत ८ पोलिसांना ठार मारले. या घटनेला एक आठवडा होत असताना उ. प्रदेश पोलिस अद्याप त्याला पकडू शकलेले नाहीत. विकास दुबेचा एवढा दीर्घकाळ बेपत्ता असण्याचा अर्थ हा की, त्याला पोलिसांमधील कुणीतरी त्याच्यावर हल्ला होणार असल्याची खबर आगाऊ दिली होती.

पोलिसांचेच एन्काउंटर होणे ही उ. प्रदेशच्या राजकारणातील एक महत्त्वाची घटना आहे. त्या अनुषंगाने विकास दुबेचे सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते, काही भ्रष्टाचारी पोलिसांनी त्याच्या पळण्याचा मार्ग मोकळा केला हे दिसून आले.

कानपूरच्या माफिया जगतात दुबेचा मोठा दबदबा होता. त्यामुळे निवडणूक जवळ येताच त्याची मदत घेण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांची रीघ लागायची.

२००१ या साली दुबेच्या गुन्हे कारकिर्दीला एक अनपेक्षित वळण लागले व त्यानंतर तो कुख्यात झाला. या वर्षी त्याने भाजपचे एक प्रभावशाली नेते व राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची शिवली पोलिस ठाण्यात घुसून हत्या केली. या घटनेचे साक्षीदार एक डझनहून अधिक पोलिस होते पण कोणीही त्याला अडवू शकले नाहीत. जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरू झाली, जाबजबाब सुरू झाले तेव्हा प्रत्यक्ष साक्षीदार असलेले सर्व पोलिस उलटले. त्याचा परिणाम असा झाला की ट्रायल कोर्टात पुराव्याअभावी, साक्षीदार अभावी विकास दुबेची सुटका झाली.

आज दुबेने केलेल्या चकमकीत कानपूर (ग्रामीण)चे एसपी देवेंद्र मिश्रा ठार होऊनही दुबेच्या विरोधात कोणतीही कारवाई पोलिस करू शकलेले नाहीत. यावरून दुबेचा पोलिसांवर किती मोठा दबाव आहे, हे दिसून येते.

१४ मार्च २०२० रोजी देवेंद्र मिश्रा यांनी कानपूर (ग्रामीण)चे एसएसपी आनंद देव यांना एक विस्तृत पत्र लिहिले होते. या पत्रात १५० हून अधिक गंभीर गुन्हे नावावर असणारा विकास दुबे पोलिसांच्या ताब्यात का येऊ शकलेला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. या पत्रात मिश्रा यांनी सब इन्स्पेक्टर विनय तिवारी याचे दुबेशी किती घनिष्ठ संबंध आहेत, याचाही खुलासा केला होता.

आता दुबेला पळून जाण्यास माहिती पुरवल्याप्रकरणी तिवारीला निलंबित करण्यात आले आहे.  तर मंगळवारी उशीरा आणखी तिघांजणांना अटक करण्यात आली आहे. यात दुबेची सून आहे.

या पत्रात देवेंद्र मिश्रा यांनी पोलिस दलातील एका तपास अधिकार्याकडून दुबेच्याविरोधात कसा कच्चा तपास केला गेला याचीही माहिती नमूद केली होती. दुबे हा खंडणी घ्यायचा पण या पोलिसाने ‘जुनै वैर’ असे नमूद करत प्रकरणातील हवा कमी केली.

मिश्रा यांच्या या विस्तृत पत्राला उत्तर देण्याची तसदी देव यांनी घेतलेली नाही त्यांनी अन्य पोलिसांनी दिलेली माहितीही नजरेआड केली.

गेल्या सोमवारी या पत्राबाबत आयजी दर्जाच्या अधिकार्याची नेमणूक केली असून या पत्रातील आरोपांची चौकशी केली जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.

दरम्यानच्या काळात देव यांचे प्रमोशन होऊन त्यांना विशेष पोलिस दलाचे डीआयजी नेमण्यात आले होते. त्यांचे काही काळापूर्वीचे दुबेच्या काही साथीदारांसोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

पोलिस आपल्याला पकडण्यासाठी येणार असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर दुबे याने गावातील पहिली वीज घालवली. नंतर पोलिसांचा ताफा रोखण्यासाठी एक अर्थमूव्हर रस्त्यावर उभा करून ठेवला होता. पोलिस घटनास्थळी पोहचताच दबा धरून बसलेल्या दुबे व त्याच्या साथीदारांनी पोलिसांच्या ताफ्यावर बेछुट गोळीबार करत ८ पोलिसांना ठार मारले. त्यात पत्र लिहिणारे देवेंद्र मिश्रा होते. देवेंद्र मिश्रा यांचा तर निर्घृणरित्या खून करण्यात आला. त्यांच्यावर कुर्हाडीने हल्ले केले गेले. तर अन्य ६ पोलिस गोळीबारात ठार झाले. अन्य दोन पोलिसांची प्रकृती गंभीर आहे.

गावातील वीज कुणी घालवली याची चौकशी केली असता पोलिसांनी आम्हाला वीज घालवण्यास सांगितले, असे उत्तर वीज कर्मचार्यांनी दिले.

दुबेची माहिती देणार्याला अडीच लाख रु.चे बक्षिस पोलिसांनी जाहीर केले आहे. दुबे हा नेपाळमध्ये पळून गेला असेल असेही पोलिस सांगत आहेत. कानपूरपासून नेपाळची सीमा २५०-३०० किमी अंतरावर आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: