कराची-रावळपिंडी ट्रेनला आग; ७३ प्रवासी ठार

कराची-रावळपिंडी ट्रेनला आग; ७३ प्रवासी ठार

लाहोर : कराचीहून रावळपिंडीला जाणाऱ्या तेजगाम एक्स्प्रेसमधील तीन डब्यांना आग लागल्याने या डब्यातील ७३ प्रवासी ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. मृ

पाकिस्तानात पेट्रोल दराचा उच्चांक
कराचीत रहिवासी भागात विमान कोसळले; ६६ ठार
पाकिस्तानचा मानवतावादी मल्याळी कॉम्रेड: बी. एम. कुट्टी

लाहोर : कराचीहून रावळपिंडीला जाणाऱ्या तेजगाम एक्स्प्रेसमधील तीन डब्यांना आग लागल्याने या डब्यातील ७३ प्रवासी ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. मृत झालेल्या बहुतांश प्रवाशांनी डब्यात आग लागल्याने चालत्या गाडीतून उड्या मारल्या. त्यात अनेक प्रवाशी मरण पावले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अनेक प्रवाशी गंभीर जखमीही झाले आहेत. त्यांच्यावर रहिम यार खान जिल्ह्यात सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रेल्वेच्या तीन डब्यातून गॅस सिलेंडर नेत असल्याने आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. ही आग काही मिनिटात संपूर्ण एक्स्प्रेसमध्ये पसरली व त्याने डबे जळून खाक झाले. या ट्रेनमधून २०० हून अधिक प्रवासी होते.

ही दुर्घटना पंजाब प्रांतातील लाहोरपासून ४०० किमी अंतरावरील रहीम यार खान जिल्ह्यातील लियाकतपूर येथे घडल्याचे सरकारी प्रवक्त्याने सांगितले. तेजगाम एक्स्प्रेसमध्ये काही प्रवाशांनी नाश्ता बनवण्यासाठी गॅसची शेकडी पेटवली व त्या दरम्यान सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. पाकिस्तानात रेल्वेमध्ये अन्नपदार्थ तयार करण्यास बंदी आहे.

मृतांमध्ये तबलिगी समाजाचे प्रवाशी अधिक होते, ते एका कार्यक्रमासाठी लाहोरला जात होते. पण या समाजाच्या प्रतिनिधींनी रेल्वेत शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा दावा केला. बुधवारी रात्रीच डब्यांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचे प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले होते. पण रेल्वेने दुर्लक्ष केले असे तबलिगी समाजाचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0