काश्मीरमध्ये सोमवारपासून पोस्टपेड मोबाइल सेवा

काश्मीरमध्ये सोमवारपासून पोस्टपेड मोबाइल सेवा

श्रीनगर : जम्मू व काश्मीरमध्ये येत्या सोमवारी पोस्टपेड मोबाइल ग्राहकांसाठी दूरसंपर्क सेवा सुरू करण्यात येईल असे राज्य प्रशासनाने सांगितले. पण इंटरनेट

सरकारविरोधात काश्मीरातील सर्व पक्ष एकवटले
‘रेडिओ काश्मीर’ आता ‘ऑल इंडिया रेडिओ-जम्मू/श्रीनगर/लेह’
काश्मीरमध्ये दोन पंडितावर गोळ्या झाडल्या; एकाचा मृत्यू

श्रीनगर : जम्मू व काश्मीरमध्ये येत्या सोमवारी पोस्टपेड मोबाइल ग्राहकांसाठी दूरसंपर्क सेवा सुरू करण्यात येईल असे राज्य प्रशासनाने सांगितले. पण इंटरनेट सेवेबद्दल प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. शनिवारी पोस्टपेड मोबाइल सेवा सुरू होणार होती पण काही तांत्रिक कारणांमुळे ती सुरू होऊ शकली नाही.

३७० कलम रद्द केल्यानंतर गेले ६९ दिवस काश्मीरमधील मोबाइल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, त्याचबरोबर अघोषित संचारबंदी असल्याने तेथील जनजीवन व व्यवसाय ठप्प झाले आहेत. काश्मीरी नागरिकांचा रोजगार असलेला पर्यटन व्यवसायच बंद झाल्याने लोकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. गेले काही दिवस पर्यटक कंपन्या, पर्यटन व्यावसायिक, एजंट, गाइड, हॉटेल व्यावसायिक यांनी सरकारपुढे आपल्या मागण्यांची गाऱ्हाणे मांडली होती. खोऱ्यात दळणवळण यंत्रणाच बंद केल्याने पर्यटक कसे येणार असा या सर्वांचा सवाल होता.

सप्टेंबरमध्ये सरकारने लँडलाइन सेवा सुरू केली होती पण त्याने फारसा फरक पडला नव्हता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0