इंटरनेट बंद असल्याने मीडियाचे हाल – काश्मीर प्रेस क्लब

इंटरनेट बंद असल्याने मीडियाचे हाल – काश्मीर प्रेस क्लब

श्रीनगर : गेले दीडशेहून अधिक दिवस काश्मीरमध्ये इंटरनेट बंद असल्याने प्रसारमाध्यमांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत असून तेथे इंटरनेट लवकर

“माफी मागण्यास काय हरकत आहे!”
अमेरिका-इराण संघर्षात भारताचा बळी
एलआयसीतील हिस्सेदारी विकण्याची सरकारला घाई का?

श्रीनगर : गेले दीडशेहून अधिक दिवस काश्मीरमध्ये इंटरनेट बंद असल्याने प्रसारमाध्यमांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत असून तेथे इंटरनेट लवकर सुरू करावे अशी मागणी काश्मीर प्रेस क्लबने मंगळवारी सरकारला केली आहे. सरकारने प्रसारमाध्यमांचे न ऐकल्यास निदर्शने, सेमिनार व मूक मोर्चे पत्रकारांकडून काढण्यात येतील आणि गरज पडल्यास काही प्रकाशक त्यांच्या वर्तमानपत्रांचे प्रकाशन करणार नाहीत असा इशारा काश्मीर प्रेस क्लबच्या बैठकीत देण्यात आला.

मंगळवारी काश्मीर प्रेस क्लबमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जम्मू व काश्मीरमधील अनेक वर्तमानपत्रांचे संपादक व पत्रकार उपस्थित होते. या सर्वांनी एकमताने काश्मीरमध्ये लवकरात लवकर इंटरनेट सुरू करण्याची मागणी केली. केंद्र सरकार बातम्या प्रसिद्ध होऊ नये व माहितीची देवाणघेवाण होऊ नये म्हणून जाणूनबुजून इंटरनेट सेवा सुरू करत नसल्याचा आरोपही या बैठकीत करण्यात आला.

गेले पाच महिने काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सेवा बंद असल्याने प्रसार माध्यमांना काम करणे अत्यंत कठीण जात आहे. पत्रकार त्यांच्या बातम्या आपल्या वर्तमानपत्रांना पाठवू शकत नाही. अनेक महत्त्वाच्या बातम्या लोकांपर्यंत, देशाला कळू शकत नाहीत. काश्मीर खोऱ्यात अनेक गावागावांत घडामोडी घडत असतात, त्या जनतेपर्यंत जात नाही. याने मोठे नुकसान होत असून प्रसारमाध्यमांचा व्यवसायही या प्रदीर्घ इंटरनेट सेवा बंदीमुळे धोक्यात आला आहे. जाहिरातीचे उत्पन्न घटले आहे. सरकारला काश्मीरचे चित्र जगापुढे येऊ नये असे वाटत आहे, असा आरोप या बैठकीत करण्यात आला.

प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतात व केंद्र सरकारही तसेच म्हणत असते. पण प्रत्यक्षात याच माध्यमाची गळचेपी केली जात असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयात ३७० कलम रद्द करण्याबाबत अनेक याचिका दाखल झाल्या आहेत त्यात काही संपादकांच्याही आहेत. त्यांची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही.

दरम्यान मंगळवारपासून काश्मीर खोऱ्यात एसएमएस सेवा तर इस्पितळात ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यात आली आहे. पण पूर्ण खोऱ्यात अजूनही इंटरनेट सेवा बंद आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: