काश्मीर : तीन महिन्यात १० हजार कोटींचे नुकसान

काश्मीर : तीन महिन्यात १० हजार कोटींचे नुकसान

श्रीनगर : गेल्या ऑगस्ट महिन्यात जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम रद्द करण्याच्या संसदेच्या निर्णयानंतर संपूर्ण काश्मीर

कलम ३५अ रद्द : आर्थिक कारणे आहेत का?
दोन वर्षांत काश्मीरात ९६ नागरिक, ८१ जवान ठार
५ ऑगस्टनंतर काश्मीरमधील जनजीवन

श्रीनगर : गेल्या ऑगस्ट महिन्यात जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम रद्द करण्याच्या संसदेच्या निर्णयानंतर संपूर्ण काश्मीरमधील पर्यटन व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. तीन महिने असलेली संचारबंदी, इंटरनेट व मोबाइल बंदीमुळे या राज्याचे सुमारे १० हजार कोटी रु.पेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा दावा काश्मीर चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने केला आहे.

या संस्थेचे अध्यक्ष शेख आशिक यांनी, काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती जो पर्यंत पूर्ववत होत नाही तोपर्यंत नुकसान भरून येणे अशक्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. हे नुकसान अधिक असेल असेही ते म्हणाले.

काश्मीरमध्ये गेले ८६ दिवस संचारबंदी आहे आणि त्यामुळे खोऱ्यातील सर्व मुख्य बाजारपेठा काही वेळच खुल्या होतात. श्रीनगरमध्ये सकाळी काही तास व संध्याकाळी अंधार होईपर्यंत बाजारपेठा उघडल्या जातात. या काळात जेवढा व्यवसाय होईल तेवढाच होत असल्याचे शेख आशिक यांचे मत आहे. हे झालेले नुकसान दूरसंपर्क सेवा ठप्प असल्यामुळे तर अधिक होत असून व्यावसायिक दळणवळण यंत्रणा बंद असल्याने व्यवसाय करू शकत नसल्याचे शेख आशिक यांचे म्हणणे आहे.

राज्यात इंटरनेट सेवा पूर्ववत व्हावी म्हणून राज्यपालांना अनेक व्यावसायिक संघटनांनी साकडे घातले आहे.  पोलिस, राज्य प्रशासनातील वरिष्ठांच्याही अडचणींचा पाढा वाचलेला आहे. जर काश्मीरमधील व्यवसाय वाढला नाही तर त्याचे गंभीर परिणाम काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर पडू शकतील याकडेही आम्ही लक्ष वेधल्याचे शेख आशिक यांचे म्हणणे आहे.

काश्मीरमधील हस्तकलेला मोठी बाजारपेठ आहे. बाहेरचे ग्राहक जुलै-ऑगस्टमध्ये आपल्या वस्तूंची ऑर्डर देतात व ख्रिसमसच्या दरम्यान हा माल पूर्ण करून पाठवला जातो. पण यंदा दूरसंपर्क यंत्रणा बंदच असल्याने हस्तकलेचे मोठे नुकसान झाले आहे. या व्यवसायाशी निगडित असलेल्या ५० हजार विणकरांचा, दस्तकारांचा रोजगार बुडाला असल्याचे आशिक यांचे म्हणणे आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: