शोपियन एन्काउंटरमधील मजूर गरीब : ग्रामस्थांचा दावा

शोपियन एन्काउंटरमधील मजूर गरीब : ग्रामस्थांचा दावा

शोपियन (जम्मू व काश्मीर)-  राजौरी जिल्ह्यातल्या इम्तियाज अहमद या मजुराने १६ जुलैला राष्ट्रीय रायफल्सच्या शोपियन नजीकच्या चौगाम कॅम्पनजीक भाड्याने एक छ

शोपियन एन्काउंटरः लष्करी अधिकाऱ्याविरोधात फिर्याद
विकास दुबे एन्काउंटरः सर्व आरोपी पोलिसांना क्लिनचीट
हैदराबाद एन्काउंटर बनावट; १० पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना

शोपियन (जम्मू व काश्मीर)-  राजौरी जिल्ह्यातल्या इम्तियाज अहमद या मजुराने १६ जुलैला राष्ट्रीय रायफल्सच्या शोपियन नजीकच्या चौगाम कॅम्पनजीक भाड्याने एक छोटी खोली घेतली होती.

तो खोली भाड्याने घेण्यासाठी माझ्याकडे आला पण मी त्याला पहिल्यांदा नकार दिला. पण त्याने मला एका स्थानिक ग्रामस्थ मोहम्मद युसूफ याची ओळख सांगितली मग मी त्याला १६०० रुपये प्रतिमहिना भाड्यावर खोली दिली, असे चौगाममध्ये राहणारे शकील अहमद सांगतात.

शकीलची पत्नी फरीदा सांगते, खोली भाड्याने दिल्यानंतर लगेचच तिघेजण तेथे राहण्यास आले. त्यांनी बाहेरून तांदूळ, भाजीपाला, तेल व अन्य खाद्यपदार्थ आणले.

दुसर्या दिवशी सकाळी आम्हाला त्यांच्या खोलीला बाहेरून कुलुप लावलेले दिसले. पण त्या खोलीची एक खिडकी उघडी होती. आम्ही दार वाजवले पण आतून कोणीही आवाज दिला नाही. नंतर आजपर्यंत या खोलीवर कोणीही तिघांपैकी आलेले नाहीत, त्यांचा पत्ता आम्हाला माहिती नाही, असे फरीदा सांगतात.

१६ जुलै व १७ जुलैच्या दरम्यान तीन युवक बेपत्ता झाले. त्यांचे कपडे अजून खोलीत टांगलेले आहेत. मोबाइलचा चार्जर सॉकेटमध्ये तसाच आहे. काही भांड्यांमध्ये अन्न तसेच शिल्लक आहे. घरमालकाने अजूनही ती खोली उघडलेली नाही.

१७ जुलैला या खोलीपासून १०-१२ किमी अंतरावर मिर्झपोरा चाक येथे एन्काउंटरमध्ये तीन

एन्काउंटर झाले ती खोली.

एन्काउंटर झाले ती खोली. (छायाचित्र : उमेर मकबूल)

दहशतवादी मारले गेले असे लष्कराचे म्हणणे आहे. पण राजौरीमधील मोहम्मद युसूफ यांच्या कुटुंबाने हे तिघेजण दहशतवादी नसून आमच्या घरातील सदस्य असल्याचा आरोप केला आहे. हे तिघे शोपियनमध्ये मजुरीसाठी आले होते. ते गरीब होते, ते दहशतवादी नव्हते व त्यांचा कोणत्याही दहशतवादी गटाशी कसलाच संबंध नव्हता, असे युसूफ यांचे म्हणणे आहे.

चौगाममधील स्थानिक नागरिक तौसिफने सांगितले, इम्तियाज हा अनेक वर्षे येथे मजूर म्हणून कामास येतो आणि आम्हाला त्याला चांगले ओळखतो.

मिर्झपोरा चाक या भागातील स्थानिकही एन्काउंटर केलेले दहशतवादी नव्हते, असे सांगतात. एक स्थानिक लालदिन खताना यांनी, मी दहशतवाद पाहिलाय. हे तिघे गरीब होते, त्यांचे कपडेही जुने होते. त्यांच्या चपला-बूट जीर्ण झाले होते. असे कपडे दहशतवादी घालतात का? असा सवाल केला. ठार मारलेल्या तिघांपैकी दोघांचे चेहरे ओळखू नये इतके विद्रूप केले गेले होते. तिसरा चेहर्यावरून खूप तरुण दिसत होता, असे खताना यांचे म्हणणे आहे.

१६ जुलैला ज्या बागेच्या ठिकाणी एन्काउंटर झाले त्या ठिकाणचे मालक मोहम्मद युसूफ यांना लष्कराने झालेल्या घटनेची माहिती १८ जुलैला दिली. मला जेव्हा तीन दहशतवाद्यांचे मृतदेह दाखवले ते मला ओळखता आले नाही. लष्कराने या भागात राहणार्या बसित (बासू) या दहशतवाद्याचा हा मृतदेह आहे का, असे मला विचारले. तेव्हा मी या भागातले हे दहशतवादी नसल्याचे सांगितले. ११ ऑगस्टला मला रेशी नागारी येथील लष्कराच्या एका कॅम्पमधील मेजरने बोलावले. त्या अगोदर मेजरने मला फोन केला आणि एन्काउंटर झालेल्या दिवशी घटनास्थळी जे स्थानिक नागरिक जमा झाले होते, त्यांची नावे काय, असे विचारले. कॅम्पमध्ये येणे तुझ्या फायद्याचे आहे, असे मेजरचे म्हणणे होते.

ज्या खोलीमध्ये तिघांचे एन्काउंटर झाले त्या खोलीत लाकडे, वाळू, शेण्या होत्या. तिथे कोणीच राहात नव्हते असे माशकूर अहमद यांचे म्हणणे होते.

आमशीपोरा येथे १७ व १८ जुलैच्या मध्यरात्री एन्काउंटर झाले. या गावातील अनेकांनी गोळीबाराचे आवाज ऐकले. पहाटे ४ च्या सुमारास पुन्हा गोळीबार होऊन नंतर मोठ्या प्रमाणात गोळीबार व बॉम्बगोळे फुटल्याचे आवाज ऐकू आले.

१८ जुलैला लष्कराच्या जवानांनी काही स्थानिकांना उठवले व खोलीला लागलेली आग विझवण्यास सांगितले. आम्ही जेव्हा त्या खोलीच्या नजीक गेलो तर खोलीतून आग दिसत होती व तीन मृतदेह आढळले, असे एका स्थानिक ग्रामस्थाने सांगितले.

सोमवारी संध्याकाळी लष्कराने या घटनेची चौकशी केली जाईल, असे पत्रक काढले. या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली नाही व त्यांचे मृतदेह शासकीय नियमानुसार दफन करण्यात आले असे सांगण्यात आले.

तरीही मारण्यात आलेले तिघे मजूर नसून दहशतवादी होते, असा सरकारचा दावा कायम आहे. नायब राज्यपालांचे सल्लागार फारुख खान या वरिष्ठ अधिकार्याने, जे कोणी हे बनावट एन्काउंटर असल्याचा आरोप करत आहेत, ते एका कटात सामील असून जम्मू व काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेला अधिक संकटात टाकत असल्याची टीका केली. अशा कटकारस्थानाचा पर्दाफाश केला जाईल व चौकशी केली जाईल, असे फारुख खान म्हणाले.

मूळ बातमी

या बातमीचा पहिला भाग वाचाः ‘एन्काउंटर झालेले दहशतवादी नव्हेत; आमच्या घरातले सदस्य’

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0