केरळात ई. श्रीधरन भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

केरळात ई. श्रीधरन भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

तिरुवनंतपुरमः भाजपने मेट्रो मॅन म्हणून देशभर ओळखणारे ८८ वर्षांचे ई. श्रीधरन यांच्या नावाची केरळच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून गुरुवारी घोषणा केल

कर्नाटकातील बंडाळी
गेला ‘माधव’ कुणीकडे
उत्तरप्रदेश जिंकला तरी भाजपचा पराभवच होणार!

तिरुवनंतपुरमः भाजपने मेट्रो मॅन म्हणून देशभर ओळखणारे ८८ वर्षांचे ई. श्रीधरन यांच्या नावाची केरळच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून गुरुवारी घोषणा केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन सध्या राज्यव्यापी दौर्यावर असून त्यांनी केरळमध्ये भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री म्हणून ई. श्रीधरन असतील असे जाहीर केले. केरळमध्ये येत्या ६ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुका होत आहेत.

ई. श्रीधरन यांचा विधानसभा मतदारसंघ अद्याप निश्चित झालेला नाही. पण आपण निवडणूक लढण्यास तयार आहोत, माझा विजय निश्चित आहे. केरळमध्ये भाजपची सत्ता येईल, असे श्रीधरन यांनी म्हटले आहे. श्रीधरन यांनी मलप्पुरम येथील पोन्नानी मतदारसंघाला पसंती दिल्याचे समजते. पोन्नानी मतदारसंघाच्या नजीकच सध्या श्रीधरन यांचे वास्तव्य आहे.

आपण प्रत्यक्ष मतदाराच्या दारात, दुकानदारांना भेटून प्रचार करणार नाही, पण माझा संदेश जनतेपर्यंत पोहचेल, असे श्रीधरन यांनी बुधवारी कोचीत स्पष्ट केले होते.

दोन आठवड्यांपूर्वीच श्रीधरन यांनी भाजपमध्ये आपण प्रवेश करत असल्याचे जाहीर करून धक्का दिला होता. त्यांनी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारचे कौतुकही केले होते. गेल्या कित्येक वर्षांत केरळमध्ये सत्तारुढ माकपप्रणित एलडीएफ आघाडी व काँग्रेसप्रणित यूडीएफ आघाडीने ठोस प्रगती केली नसल्याचे सांगत आपण भाजपमध्ये जात असल्याचे श्रीधरन यांनी सांगितले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0