कोलकाता पोलिसांची नुपूर शर्माविरोधात लुकआउट नोटीस

कोलकाता पोलिसांची नुपूर शर्माविरोधात लुकआउट नोटीस

पश्चिम बंगालच्या कोलकाता पोलिसांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणात त्यांच्यासमोर हजर होण्यासाठी वारंवार समन्स बजावले आहेत, परंतु आता हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात शनिवारी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.

बंगालमध्ये तृणमूल, पण ममतादीदींचा पराभव
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी १५ प्रश्न (त्यांनी कधी उत्तर द्यायचे ठरवलेच तर!)
केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर वाद

 कोलकाता: कोलकाता पोलिसांनी शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली. प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीसाठी चार वेळा नोटिस बजावूनही त्या गैरहजर राहिल्याने नोटीस बजावण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

शर्मा यांच्या वक्तव्यानंतर पश्चिम बंगालच्या अनेक भागात हिंसक निदर्शने सुरू झाली होती.

अधिकाऱ्याने सांगितले, की अॅमहर्स्ट स्ट्रीट आणि नरकेलडांगा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या समन्सवर शर्मा हजर राहिल्या नव्हत्या.

“अनेक वेळा समन्स जारी करूनही आमच्या अधिकार्‍यांसमोर हजर न राहिल्याने नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध आज लुकआउट नोटीस जारी करण्यात आली,” असे पोलिस अधिकारी म्हणाले.

शर्मा यांना दोन्ही पोलिस ठाण्यांकडून दोनदा समन्स बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या महिन्यात दोन्ही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शर्मा यांच्याविरुद्ध समन्स बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शर्मा यांनी कोलकाता दौऱ्यात आपल्यावर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली होती आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला होता.

‘द हिंदू’च्या वृत्तानुसार, लोकांनी वैयक्तिकरित्या केलेल्या तक्रारींच्या आधारे नुपूरविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कोलकाता पोलिसांच्या अखत्यारीतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये शर्माविरोधात किमान १० तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांना फटकारल्यानंतर या लूक आऊट नोटीस आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले होते, की  देशात जे काही चालले आहे त्याला ही महिला एकटीच जबाबदार आहे. त्यांनी आणि त्यांच्या बेलगाम जिभेने संपूर्ण देश पेटवून दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, की शर्मा यांचे वक्तव्य उदयपूरमधील दुर्दैवी घटनेला जबाबदार आहे, जिथे एका शिंप्याची हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, “तिने ज्या प्रकारे देशभरातील भावना भडकवल्या आहेत. त्याला त्या एकट्याच जबाबदार आहेत. आम्ही टी टीव्ही चर्चा पाहिली. त्यांना कसे भडकवले गेले हे आपण पाहिले, पण त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने हे वक्तव्य केले आणि तेही त्या एक वकील असताना, हे लज्जास्पद आहे. त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे.”

कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सीद्वारे एखाद्या तपासात वॉन्टेड किंवा फरार असलेल्या व्यक्तीविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली जाते. ही नोटीस त्या व्यक्तीला देश सोडण्यापासून प्रतिबंधित करते.

१३ जून रोजी नरकेलडांगा पोलिस ठाण्यात शर्मा यांच्या विरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आणि त्यांना २० जून रोजी पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले. २३ जून रोजी एमहर्स्ट स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आणि नुपूर शर्माला २५ जूनला पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले. शर्मा दोन्ही समन्सवर हजर राहिल्या नाहीत आणि त्यांनी आणखी वेळ मागितला.

नुपूरने पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर हावडासह पश्चिम बंगालच्या अनेक भागात निदर्शने झाली. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांना रस्ते अडवून सार्वजनिक मालमत्तेवर हल्ला करण्याऐवजी पोलिस तक्रार करण्याचे आवाहन केले.

या आठवड्याच्या सुरुवातीला, ममता बॅनर्जी यांनी कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि पत्रकार मोहम्मद जुबेर यांच्यावरील पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, राज्य पोलिस भाजपच्या माजी प्रवक्त्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले होते.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0