राम नवमी : काही ठिकाणी लॉकडाऊनला फाटा

राम नवमी : काही ठिकाणी लॉकडाऊनला फाटा

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन जगभर केले जात असताना गुरुवारी मात्र राम नवमीच्या निमित्ताने कोलकातापा

तिसऱ्या लाटेचा धोका आहेचः मुख्यमंत्री
१५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट
साथीचे रोग प्रतिबंध कायदा कसा अस्तित्वात आला…

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन जगभर केले जात असताना गुरुवारी मात्र राम नवमीच्या निमित्ताने कोलकातापासून शिर्डीपर्यंत अनेक देवस्थान मंदिरात भाविक गोळा होऊन पूजाअर्चा, स्तोत्रे, आरत्या म्हणताना दिसून आले.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार कोलकाता येथील बेलियाघाट, माणिकताळा येथे मोठ्या प्रमाणावर हिंदू भाविक राम नवमीच्या सोहळ्यासाठी उपस्थित होते. पोलिसांनी गर्दी करू नये, असे वारंवार आवाहन केले होते, भाविकांनी आपापल्या घरी जावे असे आवाहन केले होते. गर्दी टाळण्यासाठी विश्व हिंदू परिषद व अन्य उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी आपापल्या शोभायात्रा रद्द केल्या होत्या पण देवळात मात्र राम नवमीसाठी भाविक जमा झाले होते. कोरोनाचे संकट प्रभू रामचंद्राने परतावून लावावे, अशा प्रार्थनाही केल्या जात होत्या.

द न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार तेलंगणमधील भद्रचलममधील श्री सीता रामचंद्रस्वामी मंदिरात राम व सीतेचे स्वयंवर लावण्यात आले. या सोहळ्याला गर्दी करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती पण धर्मदाय मंत्री ए. इंद्राकरन रेड्डी व वाहतूक मंत्री पुव्दा अजय कुमार हे राम-सीता स्वयंवरास हजर होते. या दोघांनी राम-सीता मूर्त्यांना रेशमी वस्त्रे अर्पण केली. या प्रसंगी ४०-५० भाविक उपस्थित होते व याचे पडद्यावरून थेट प्रक्षेपण केले जात होते. ते पाहण्यास भाविकांची बर्या प्रमाणात गर्दी झाली होती, असे एक्स्प्रेसचे म्हणणे आहे. राम-सीता स्वयंवर आटोपल्यानंतर आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: