कुणाल कामरा ट्रेंडिंग!

कुणाल कामरा ट्रेंडिंग!

२८ जानेवारीला दुपारी भारतातील प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी, रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना विमानामध्ये तोंडावर सुना

टीआरपी घोटाळाः अर्णवचा आरोपपत्रात आरोपी म्हणून समावेश
टीआरपी रॅकेटमध्ये रिपब्लिक टीव्ही
रिपब्लिक टीव्ही प्रसारण बंदी : हायकोर्टात २ याचिका

२८ जानेवारीला दुपारी भारतातील प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी, रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना विमानामध्ये तोंडावर सुनावल्याने ते सोशल मिडीयावर चर्चेत आले आहेत. तर इंडिगो विमान कंपनीने त्यांना ६ महिन्यांची प्रवासबंदी केली आहे.

6E 5317 मुंबई ते लखनौ या विमानाने आज दुपारी कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी प्रवास करीत होते. कामरा यांनी गोस्वामी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण गोस्वामी यांनी त्यांना प्रतिसाद न दिल्याने, गोस्वामी यांना उद्देशून त्यांच्या समोर कमरा यांनी स्वागत व्यक्त केले आणि त्याचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला.

कुणाल कामरा यांनी हे स्वागत रोहित वेमुल्ला याला अर्पण केले. हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुल्ला या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर अर्णब यांनी आपल्या टीव्ही कार्यक्रमामध्ये त्याच्याविषयी जी टिपण्णी केली होती, त्यावर चिडून कामरा यांनी हे स्वागत अर्णब यांना ऐकविले. हा व्हिडिओ ध्रुव राठी यांनीही सोशल मिडीयावर पोस्ट केला आणि त्यालाही जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

कामरा यांचा व्हिडिओ सुमारे १० लाख ६० हजार लोकांनी अल्पावधीत पहिला आणि रात्रीपर्यंत तो २५ हजार जणांनी रीट्वीट केला. त्यानंतर इंडिगो विमान कंपनीने कामरा यांना ६ महिन्याची प्रवासबंदी केली. त्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सर्व विमान कंपन्यांनी कामरा यांना प्रवासबंदी करावी असे आवाहन केले. त्यानंतर लगेच एअर इंडियानेही प्रवासबंदी जाहीर केली.

कमरा यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हंटले आहे, की रिपब्लिक किंवा टाईम्स नाऊ वाहिन्यांचे पत्रकार जे करतात, तेच मी केले आहे. कामरा यांनी इतर प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांची माफीही मागितली.

नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या आवाहनानंतर स्वाती चतुर्वेदी, ध्रुव राठी आणि सलील त्रिपाठी यांनी यापूर्वी टाईम्स नाऊ आणि रिपब्लिक वाहिन्यांच्या पत्रकारांनी यापूर्वी विमानामध्ये याचप्रकारे केलेल्या कृत्यांचे व्हिडिओ पोस्ट करून त्यांच्यावर मंत्री गप्प का होते, असे सवाल केले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0