लडाखच्या चित्ररथात कारगीलबाबत भेदभाव

लडाखच्या चित्ररथात कारगीलबाबत भेदभाव

श्रीनगरः येत्या प्रजासत्ताक दिनी राजपथावरून जाणार्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या चित्ररथात कारगील जिल्ह्याचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा पूर्णतः दु

गोगोईंना बक्षिसी
अफगाणिस्तानातून सप्टेंबरपर्यंत अमेरिकेच्या सैन्याची माघार
‘हिचकॉक’वरची पुस्तकं

श्रीनगरः येत्या प्रजासत्ताक दिनी राजपथावरून जाणार्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या चित्ररथात कारगील जिल्ह्याचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप कारगील जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी केला आहे.

३१ ऑक्टोबर २०१९मध्ये जम्मू व काश्मीर राज्यातून लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आला. लडाखमधील लेह जिल्हा हा बौद्ध बहुल असून कारगील जिल्हा हा मुस्लिम बहुल प्रदेश आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या या प्रदेशाचा भौगोलिक नकाशा बदलला असला तरी त्याचे सांस्कृतिक व धार्मिक वास्तव, वारसा बदललेला नाही. पण लडाखच्या चित्ररथात मुस्लिमांच्या अस्तित्वालाच वगळून केवळ बौद्ध वारसा दाखवल्याचा आरोप कारगीलमधील नेत्यांचा आहे.

लडाखच्या चित्ररथात दाखवलेला बौद्ध धर्माचा वारसा व सांस्कृतिक वैभवाला आमचा आक्षेप नाही पण या चित्ररथात जाणूनबुजून कारगीलचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा व वैभव न दाखवण्याचा प्रयत्न सरकारने केल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. लडाखचा चित्ररथ अत्यंत एकांगी स्वरुपाचा असून एकाच घटकाची त्यात दखल घेण्यात आली आहे. या चित्ररथात मुस्लिम सांस्कृतिक वारसा व वैभव न दाखवण्यामागचे कारण काय असा सवाल कारगीलमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सज्जाद कारगिली यांनी केला आहे.

द वायरशी बोलताना सज्जाद कारगिली यांनी केंद्र सरकारने कारगीलला डावलण्याचा हेतुपुरस्सर निर्णय घेतला आहे, कारगीलची संस्कृती पुसण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही केला आहे.

या प्रकरणावरून लडाख स्वायत्त पर्वत विकास परिषदेचे सदस्य फिरोज अहमद खान यांनी नायब राज्यपाल आर. के. माथूर यांना एक पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. लडाखचा चित्ररथ या प्रदेशाचे वैभव दाखवण्यास कमी पडल्याचाही उल्लेख खान यांनी आपल्या पत्रात केला आहे.

लडाखचा चित्ररथ

लडाखच्या चित्ररथात थिकसे मठाचे चित्रण दाखवण्यात आले आहे. या प्रदेशात गेलूग या तिबेटी बौद्ध पंथाचा प्रभाव आहे. थिकसे मठाची रचना ल्हासा येथील पोटाला राजवाड्याशी साधर्म्य दाखवणारी आहे. हा प्रदेश भूऔष्णिक व सौर उर्जा वापरून ‘कार्बन न्यूट्रल’ करण्याची एक पर्यावरण मोहीम येथे सुरू आहे. त्याचाही समावेश या चित्ररथात आहे. पण जेव्हा चित्ररथाविषयी एक बैठक झाली होती त्या बैठकीत भविष्यातील लडाख अशी कल्पना मांडण्यात आली होती. या कल्पनेत लडाख प्रदेशाची सांस्कृतिक व परंपरांची श्रीमंती दाखवण्याबरोबर लडाखमधील विकास कार्यक्रमाचाही समावेश करण्यात आला होता. चित्ररथामध्ये लडाखमधील पारंपरिक नृत्य, संगीत यांचाही समावेश करण्यात आला होता, व त्यावर सरकारी प्रतिनिधींशी चर्चाही झाली होती. या बैठकीसंदर्भातील कागदपत्रे द वायरकडे आहेत. ही बैठक नायब राज्यपालांचे सल्लागार उमंग नरुला यांच्यासोबत झाले होती.

कारगीलची सांस्कृतिक ओळख वगळण्याबद्दल लडाखचे सांस्कृतिक सचिव रिगझिन सॅमफेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला पण त्यांची प्रतिक्रिया मिळालेली नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: