शेतकऱ्यांना चिरडून टाकणारा व्हीडिओ व्हायरल

शेतकऱ्यांना चिरडून टाकणारा व्हीडिओ व्हायरल

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे आंदोलक शेतकर्यांच्या अंगावर गाडी घालणारा व्हीडिओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशभर संतापाचे

‘ट्रॅक्टर रॅली’ संबंधित निर्णय पोलिसांनी घ्यावेत’
शेतकरी संघटनांशी चर्चेस तयारः कृषीमंत्री
शेतकरी आंदोलन आणि नवउदारमतवाद

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे आंदोलक शेतकर्यांच्या अंगावर गाडी घालणारा व्हीडिओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशभर संतापाचे वातावरण पसरले. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर मृत शेतकर्यांच्या कुटुंबियांनी मरण पावलेल्यांचे पोस्ट मार्टमची मागणी केली आहे. पोस्ट मार्टम होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार होऊ देणार नाही या भूमिकेवर शेतकरी ठाम राहिले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली असून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना लखनौ विमानतळावरच अडवून ठेवले गेले.

वरुण गांधी यांनी ट्विट केलेला व्हिडीओ.

वरुण गांधी यांनी ट्विट केलेला व्हिडीओ.

आंदोलक शेतकर्यांचा अंगावर गाडी घालणार्या व्हीडिओची सत्यता स्पष्ट झालेली नाही. पण एक एसयूव्ही गाडी भरधाव वेगात आंदोलन करणार्या शेतकर्यांच्या घोळक्यावर मागून जाताना दिसली. त्यात काही शेतकरी चिरडले गेले. या प्रकरणात ४ शेतकरी ठार झाले होते. ही गाडी कोण चालवत होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा व्हीडिओ अंगावर शहारे आणणारा असल्याने सत्ताधारी भाजपविरोधात सोशल मीडियात व राजकीय-सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी ट्विटरवर केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0