शोकाकुल वातावरणात लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शोकाकुल वातावरणात लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली असून, त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी दादर येथे शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अं

वेगळी रेंज, भिन्न प्रकृतीही यशस्वी
लताची विविधरंगी, विविधढंगी मराठी गाणी
लता मंगेशकर यांचे निधन

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली असून, त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी दादर येथे शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना अग्नी दिला.

भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचे वय ९२ होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

आज संध्याकाळी पंत्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्क येथे त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यापूर्वी लता मंगेशकरांच्या प्रभुकुंज या घरापासून शिवाजी पार्कपर्यंत अंत्ययात्रा निघाली होती. त्यांच्या पार्थिवाचे राष्ट्रवादी काँगसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री आदित्य ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, अभिनेता शाहरूख खान, आमिर खान, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गीतकार जावेद अख्तर आणि इतरही अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेतले.

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने विशेष योजना आखली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढील १५ दिवस राज्यातील प्रत्येक सार्वजनिक ठिकाण, सरकारी कार्यालये आणि ट्रॅफिक सिग्नलवर लता मंगेशकर यांची गाणी वाजवण्याची घोषणा केली आहे. यासोबतच बंगाल सरकारने सोमवारी ७ फेब्रुवारीला अर्धा दिवस सुट्टी असेल अशी घोषणा केली आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. ६ फेब्रुवारी आणि ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राष्ट्रीय दुखवटा पाळला जाईल. यादरम्यान देशभरात देशाचा तिरंगा ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. तसेच राज्यात ७ फेब्रुवारी रोजी दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी रविवारी सकाळी दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे ‘लता दीदींसारखा कलाकार शतकात एकदाच जन्माला येतो. त्या एक असाधारण व्यक्ती होत्या. हा दैवी आवाज कायमचा थांबला आहे, पण त्यांनी गायलेली गाणी चिरंतन राहतील, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याचबरोबर त्यांना न्यूमोनियाही झाला होता. कोरोनाची सौम्य लक्षण जाणवत असल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. २८ जानेवारीला त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते. ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये केली. ही कारकीर्द पुढची ६० वर्षे सुरू होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली. २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांनी हा वारसा पुढे नेला. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांना लता असे नाव ठेवण्यात आले. लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे त्यांची अनेक गाणी अजरामर झाली आहेत. त्यांनी आनंदघन या नावाने संगीतही दिले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: