नवज्योत सिद्धू यांना एक वर्षाचा तुरुंगवास

नवज्योत सिद्धू यांना एक वर्षाचा तुरुंगवास

नवी दिल्लीः ३४ वर्ष जुन्या प्रकरणात दोषी ठरलेले काँग्रेसचे पंजाबमधील नेते व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना एक वर्षांचा तुरुंगवास गुरुवारी स

काँग्रेसला पुन्हा उभे राहण्यासाठीची संधी
आसाममधील एनआरसी डेटा गायब
कोडींगः वाढलेले फॅड व पालकांची दिशाभूल

नवी दिल्लीः ३४ वर्ष जुन्या प्रकरणात दोषी ठरलेले काँग्रेसचे पंजाबमधील नेते व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना एक वर्षांचा तुरुंगवास गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला. सिद्धू यांना १५ मे २०१८ रोजी न्यायालयाने एक हजार रु.चा दंड सुनावला होता. त्या शिक्षेत बदल करत त्यांना एक वर्षांचा तुरुंगवास न्या. ए.एम. खानविलकर व न्या. संजय किशन यांच्या पीठाने सुनावला.

गुरुवारी दुपारी न्यायालयाच्या निर्णयानंतर सिद्धू यांनी आपण कायद्याचे पालन करू असे ट्विट केले.

२७ डिसेंबर १९८८ मध्ये पतियाळातील शेरनवाला गेट भागात सिद्धू व त्यांचे मित्र संधू यांनी त्यांची जिप्सी कार पार्किंगच्या भागात रस्त्याच्या मधोमध उभी केली होती. हे दोघे एका बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान गुरनाम सिंग हे ६५ वर्षांचे वृद्धही पैसे काढण्यासाठी बँकेत आले होते, त्यांना आपली कार पार्क करायची होती पण त्यांच्या कारला जागा न मिळाल्याने त्यांनी मधोमध कार उभी करणाऱ्या सिद्धू व संधू यांना त्यांची कार बाजूला करण्यास सांगितले. या प्रसंगानंतर वाद निर्माण झाला व त्यात गुरनाम सिंग यांचा मृत्यू झाला. हे प्रकरण न्यायालयात गेले. १९९९मध्ये स्थानिक न्यायालयाने पुराव्याअभावी हा खटला चालवला जाऊ शकत नाही असा निर्णय दिला. पण नंतर २००२मध्ये पंजाब सरकारने सिद्धू यांच्याविरोधात पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात अपील केले. त्यानंतर १ डिसेंबर २००६मध्ये उच्च न्यायालयाने सिद्धू व संधू या दोघांना गुरनाम सिंग यांच्या हत्येप्रकरणात दोषी ठरवत दोघांना प्रत्येकी ३ वर्षांचा तुरुंगवास व प्रत्येकी १ लाख रु. दंड अशी शिक्षा सुनावली. या शिक्षेच्या विरोधात दोघांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. सर्वोच्च न्यायालयाने या दोघांना जामीन दिला तसेच त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. सिद्धू व संधू यांच्या विरोधातील खटला सुमारे ३० वर्षे जुना असून हे दोघे गुरनाम सिंग यांना ओळखत नव्हते, त्यांच्यामध्ये वैरही नव्हते. त्याच बरोबर घटनास्थळी कोणतेही शस्त्र सापडले नाही, असे सांगत या दोघांना एक हजार रु.च्या दंडावर जामीन दिला. त्यानंतर पीडितांच्या कुटुंबियांनी सिद्धू व संधू यांना दंड ठोठावण्यापेक्षा त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाला केली होती. या मागणीवर विचार करून न्यायालयाने दंडाच्या शिक्षेत बदल करत दोघांना १ वर्षाचा तुरुंगवास ठोठावला.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: