देशात मोफत लस द्यावीः १३ विरोधी नेत्यांची मागणी

देशात मोफत लस द्यावीः १३ विरोधी नेत्यांची मागणी

नवी दिल्लीः देशातल्या १३ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहून देशभरात कोरोनाची मोफत लस द्यावी असा आग्रह धरला आहे. देशातील कोरोनाची

सीरमने सर्व आरोप फेटाळले
कोव्हिड लसींची परिणामकारकता
मोदींच्या वाढदिवशी लसीकरण आणि सर्टिफिकेट घोटाळा

नवी दिल्लीः देशातल्या १३ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहून देशभरात कोरोनाची मोफत लस द्यावी असा आग्रह धरला आहे. देशातील कोरोनाची वाढती साथ पाहून सरकारने तातडीने अर्थसंकल्पात मंजूर केलेली ३५ हजार कोटी रु.ची तरतूद मोफत लसीकरण मोहिमेत वापरावी. ऑक्सिजनच्या टंचाईवर मात करून केंद्राने सर्व रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवावा, देशातील सर्व कोविड सेंटर व सरकारी-खासगी रुग्णालयांमध्ये कोविडविषयक अत्यावश्यक औषध उपचार वाढवावेत अशी मागणी या नेत्यांनी केली आहे.

या नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, जेडीएसचे प्रमुख व माजी पंतप्रधान देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टालिन, बसपाच्या प्रमुख मायावती, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, राजदचे नेते तेजस्वी यादव, माकपचे सीताराम येचुरी व भाकपचे डी. राजा यांचा समावेश आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: