महाराष्ट्रासह देशभरात कोविड संसर्गामध्ये जोरदार वाढ

महाराष्ट्रासह देशभरात कोविड संसर्गामध्ये जोरदार वाढ

नवी दिल्ली: भारतातील कोविड-१९ रुग्णांची संख्या पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जणांना कोविडचा संसर्ग होत आहे. गेल्या २४ त

लॉकडाऊन -४ मध्येही बुडाला पारंपरिक मच्छिमार
करोना. विकलांग समाजावर रोगाचा हल्ला
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आव्हान किती?

नवी दिल्ली: भारतातील कोविड-१९ रुग्णांची संख्या पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जणांना कोविडचा संसर्ग होत आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात २१,३२८ जणांना कोविडची लागण झाली. त्यापाठोपाठ केरळमध्ये २,१००, पंजाबमध्ये १,०४३, कर्नाटकात ६२२, गुजरातमध्ये ५७४ आणि तमीळनाडूत ५६७ कोविड रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत संपूर्ण देशभरात १८,६५० जणांना नव्याने कोविडची लागण झाली. त्यामुळे देशातील ‘अॅक्टिव’ रुग्णांची संख्या १.८५ लाख झाली आहे.

भारतात एकीकडे कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा उसळी घेतली असताना दुसरीकडे लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू आहे आणि दुसराही १ मार्चपासून सुरू झाला आहे. ६ मार्च रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, १९.१ दशलक्ष लशी देण्यात आल्या आहेत. या आठवड्यापासून लष्करी सेवेतील वरिष्ठ अधिकारी व त्यांचे कुटुंबीय यांनाही लस घेता येईल असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.

स्थानिक स्तरावर कोविड संसर्गाचा उद्रेक का होत आहे याची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न सध्या तज्ज्ञ करत आहेत. भारतामध्ये “एका वेळी अनेक साथी सुरू असतात” आणि सर्व लोकसंख्या या साथींना एकसमान पद्धतीने बळी पडत नाहीत, असे मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सामुदायिक आरोग्य विषयाचे प्राध्यापक रजीब दासगुप्ता यांनी गेल्या आठवड्यात व्यक्त केले होते. ‘या टप्प्यात स्थानिक स्तरावर अधिक भर दिला पाहिजे. स्थानिक स्तरावरील अनेक क्षमतांचा कस लागणार आहे,’ असेही ते म्हणाले.

नोव्हेल कोरोनाव्हायसरचे नवीन प्रकार लोकसंख्येत संक्रमित होत आहेत याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. “महाराष्ट्रात जानेवारी २०२१च्या अखेरीस कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये एका रुग्णाच्या नमुन्यात तथाकथित ईफोरएटफोरके म्युटेशन आढळून आले. हा रुग्ण अमरावती जिल्ह्यातील होता. यवतमाळ जिल्ह्यातील एकाच्या नमुन्यामध्ये एनफोरफोरझिरोके म्युटेशन आढळून आले होते,” अशी बातमी प्रियंका पुल्ला यांनी गेल्या आठवड्यात दिली होती. महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येमागे हीच म्युटेशन्स असावीत अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

अर्थात वाढत्या केसेसमागे कोरोनाचा नवीन प्रकार आहे या निष्कर्षाप्रतही एवढ्या लवकर पोहोचणे योग्य नाही. कोविड-१९ साथीला समजून घेणे कधीच सोपे नव्हते, कारण, देशातील राज्याराज्यांमध्ये अनेकविध उद्रेक झाले आणि ते वेगवेगळ्या वेळी सुरू झाले, कमाल मर्यादेपर्यंत पोहोचले आणि कमी झाले. निदानाच्या दरातही मोठी विषमता आहे.

लंडनमधील मिडलसेक्स युनिव्हर्सिटीतील गणित तज्ज्ञ मुराद बानाजी यांच्या मते १९ सप्टेंबर २०२० रोजी राष्ट्रीय स्तरावर कोविड रुग्णसंख्येने कमाल मर्यादा गाठल्यानंतर नवीन प्रादुर्भाव ओळखण्याची देशाची क्षमता कमी झाली असावी. ते म्हणाले की, सिरोप्रिव्हेलन्स खूप वाढल्याचे दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांतील सर्वेक्षणातून दिसून येते. डिसेंबरपर्यंत साथ शहरी भागातून ग्रामीण भागात पूर्णपणे पोहोचली होती. मात्र, या भागातील रुग्णसंख्या किंवा मृत्यूदराची नोंद नीट होत नव्हती. राष्ट्रीय स्तरावरील स्थिती सुधारत आहे असे आपल्याला वाटत होते, तेव्हा कदाचित ग्रामीण भागाला कोविड-१९ साथीने विखळा घातलेला होता.

भारतातील मूलभूत पुनरुत्पादन क्रमांक अर्थात आरओ नोव्हेंबरच्या अखेरीस ०.९३ होता तो आता १.०६ झाला आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात रोग पसरला तेव्हा शहरांमध्ये अधिक चांगली देखरेख होती. त्यामुळे त्या काळात आलेला डेटा हा प्रामुख्याने शहरी डेटा होता.

असमान डेटा, डेटाचा विषम दर्जा आणि सध्याच्या डेटाची विषम उपलब्धता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून राजकीय नेते करत असलेल्या दाव्यांचे सत्यापन कठीण होऊन बसले होते.

सर्वाधिक नवे रुग्ण आढळणाऱ्या आठ राज्यांमध्ये दिल्लीचा समावेश असला, तरी ‘साथ अंताकडे आली आहे’ असेच दिल्ली सरकारला वाटत आहे, असे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले. दिल्लीमध्ये ५ मार्च रोजी महिनाभरातील सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद झाली, असे एनडीटीव्हीच्या बातमीत नमूद करण्यात आले आहे. सध्या दिल्लीतील पॉझिटिविटी दर ०.५ टक्के आहे.

अर्थात हा साथीची दुसरी लाट आहे की साथ संपण्याच्या दिशेने चाललेली वाटचाल आहे याचा निर्णय डब्ल्यूएचओ किंवा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांसारख्या यंत्रणांनी घ्यायचा आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष जे. ए. जयालाल म्हणाले. कोविड साथीबद्दलचा निर्णय राजकीय स्तरावर घेतला जाऊ शकत नाही आणि आपण कोविड संसर्गाविरोधात करत असलेले प्रयत्न शिथील करून चालणार नाही. या निर्णायक टप्प्यावर आपला लढा सौम्य झाला तर त्याचे परिणाम विघातक असतील, असे जयालाल म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0