लोकल प्रवासाला लसीकरण आवश्यक

लोकल प्रवासाला लसीकरण आवश्यक

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ ऑक्टोबर आणि २६ ऑक्टोबर २०२१ तसेच ८ जानेवारी, ०९ जानेवारी, ३१ जानेवारी २०२२ रोजी जारी केलेले आदेश राज्य

मोदींच्या वाढदिवसाला बिहार सरकारचा डेटामध्ये फेरफार
लसीकरण उत्सवात महत्त्वाच्या मुद्दयांकडे काणाडोळा
कोविड आरटीपीसीआर चाचण्या, लसीकरण वाढवण्याचे निर्देश

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ ऑक्टोबर आणि २६ ऑक्टोबर २०२१ तसेच ८ जानेवारी, ०९ जानेवारी, ३१ जानेवारी २०२२ रोजी जारी केलेले आदेश राज्यात अद्याप लागू आहेत. त्यामुळे लसीकरण न झालेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवासासहित इतर निर्बंध कायम आहेत. नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
कोविड विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी १५ जुलै, १० ऑगस्ट आणि ११ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेले निर्बंधाचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. मात्र तरीही ८ ऑक्टोबर, २६ ऑक्टोबर २०२१, ८ जानेवारी, ९ जानेवारी, ३१ जानेवारी २०२२ या तारखांना जारी केलेले आदेश अद्याप लागू आहेत.

नागरिकांनी व विविध सेवा देणाऱ्या संस्थांनी लसीकरण झाले असले तरी व झाले नसले तरी सार्वजनिक प्रवास करताना मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, हात वारंवार धुणे अशा कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: